CM Devendra Fadnavis
sakal
महाराष्ट्र बातम्या
CM Devendra Fadnavis : मुंबई, पुणे, नाशिकचा चेहरामोहरा बदलणार
राज्याच्या प्रमुख शहरांना विकासाची गती देण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीची बैठक आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.
मुंबई - मुंबईतील नरिमन पॉईंट ते थेट विरारपर्यंत विविध पायाभूत सुविधांचा विकास आणि सुधारणा करण्यासाठी २४.३५ किलोमीटर लांबीचा उत्तन-विरार सागरी सेतू (सी-लिंक) आता वाढवण बंदरापर्यंत नेण्यासाठी जोडरस्ता तयार करण्यात येणार आहे. यामुळे मुंबईतील उत्तर-दक्षिण रस्ते जोडणी पूर्ण होऊन प्रवासात मोठी सुधारणा होईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

