मुंबई - राज्यात २०२४ मध्ये पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सायंकाळी सहा वाजल्यानंतर ७६ लाख मते वाढली. याबाबत दाखल केलेली याचिक मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली असल्याचे सांगत, ही निवडणूक प्रक्रिया खरोखरच पारदर्शी होती का, असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला.