Amravati: चालत्या बसनी घेतला पेट,35प्रवासी थोडक्यात बचावले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Amravati

Amravati: चालत्या बसनी घेतला पेट,35प्रवासी थोडक्यात बचावले

अमरावतीमधील पिंपळेविहीर येथे मंगळवारी राज्य परिवहन (एसटी) बसला अचानक आग लागली. काही वेळातच आगीने संपूर्ण बसला घेरलं. त्यामुळे प्रवाशांमध्ये खळबळ उडाली. मात्र, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

बसमध्ये एकूण 35 प्रवासी होते. बसमधील सर्व 35 प्रवासी सुखरूप आहेत. बसला एवढी आग लागण्याचे कारण अद्याप समजू शकले नसून अचानक बसला आग लागल्याने प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली होती. ही घटना अमरावतीच्या पिंपळेविहीर येथील आहे.

बस चालक आणि कंडाक्टरला बस मधून धूर निघताना दिसला, त्यानंतर सर्व प्रवाशांना बसमधून ताबडतोब खाली उतरवण्यात आले. प्रवासी खाली उतरल्यानंतर संपूर्ण बसने पेट घेतला, आगीच्या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.

पुण्यातील येरवडा येथील शास्त्रीचौकात शिवशाही बसने घेतला पेट घेतल्याची घटना घडली आहे. यवतमाळ ते चिंचवड या मार्गावर धावणाऱ्या एस. टी. विभागाच्या शिवशाही बसने पेट घेतला होता. गाडीतील 42 प्रवाशांना खाली उतरवल्यानंतर गाडीने अचानक पेट घेतला होता. तर चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधामुळे मोठी दुर्घटना टळली अन् सर्व प्रवाशी सुरक्षित आहेत.

टॅग्स :Amravatibus accident