क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंना स्मृतिदिनी अभिवादन!

टीम ईसकाळ
गुरुवार, 28 नोव्हेंबर 2019

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची आज (28 नोव्हेंबर 1890) पुण्यतिथी! सत्यशोधक समाज संस्थेद्वारे त्यांनी समाजसुधारण्याचे व स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवण्याचे काम केले.

मुंबई : क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची आज (28 नोव्हेंबर 1890) पुण्यतिथी! सत्यशोधक समाज संस्थेद्वारे त्यांनी समाजसुधारण्याचे व स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवण्याचे काम केले. पत्नी सावित्रीबाई फुले यांच्या मदतीने समाजातील स्त्रियांना शिक्षण देण्यासाठी धडपडणाऱ्या ज्योतिबांना आज सर्वांनी आदरांजली वाहिली आहे. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

ज्योतिबांनी शेतकरी आणि बहुजन समाजाच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून त्यावर काम केले. जनतेने त्यांना 'महात्मा' ही उपाधी 1888मध्ये बहाल केली. बहुजन समाजाचे अज्ञान, दारिद्रय आणि समाजातील जातिभेद पाहून त्यांनी ही सामाजिक परिस्थिती सुधारण्याचा निश्चय केला. त्यांनी 1848मध्ये पुण्यामध्ये बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाड्यात पहिली मुलींची शाळा काढून तेथील शिक्षिकेची जबाबदारी सावित्रीबाईंवर सोपविली. महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाची ही मुहूर्तमेढ ठरली. तसेच अस्पृश्य मुलांसाठी त्यांनी पुण्याच्या वेताळ पेठेत 1852मध्ये शाळा स्थापन केली. त्यांच्या या कार्याला सनातन्यांकडून सतत विरोध होत असे. पण ज्योतीबा आपल्या भूमिकेवर ठाम असत. ज्योतिबांनी पत्‍नी सावित्रीबाईंना शिक्षण देऊन शिक्षणकार्यास प्रवृत्त केले. शाळेच्या मुख्याध्यापकपदी आरूढ झालेली भारतातील पहिली महिला म्हणजे सावित्रीबाई. त्याचप्रमाणे स्वतंत्रपणे फक्त स्त्रियांसाठी शाळा काढणारे महात्मा फुले हे पहिले भारतीय होते.

राज्यात आजपासून उद्धव सरकार  

आज सोशल मीडियावर ज्योतिबांना सर्वांनी अभिवादन केले आहे. 

 

 

 

 

 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tribute to Jyotiba Phule on his Death Anniversary