Tripura Violence : जाणीवपूर्वक अशांतता निर्माण करणाऱ्यांना सोडणार नाही; गृहराज्यमंत्र्यांचा इशारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shambhuraj Desai

त्रिपुरातील हिंसाचाराचे (Tripura Violence) पडसाद महाराष्ट्रात पाहायला मिळत आहेत.

Tripura Violence : 'जाणीवपूर्वक अशांतता निर्माण करणाऱ्यांना सोडणार नाही'

त्रिपुरातील हिंसाचाराचे (Tripura Violence) पडसाद महाराष्ट्रात पाहायला मिळत आहेत. यावर गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी आपली प्रतिक्रिया दिलीय. या हिंसाचारप्रकरणी कालपासूनच पोलिस दलाला (Police Force) सर्तक राहण्याचे आवाहन केलं असून पोलिस अधीक्षक, रेंज आयजींना अलर्ट राहण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. संभाव्य ठिकाणी पोलिस दल दाखल झाले आहे. या घटनेच्या मुळाशी आम्ही जाणार असून जाणीवपूर्वक राज्यात अशांतता निर्माण करणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही, असा इशारा देसाई यांनी दिला आहे.

राज्यातील अमरावती, मालेगाव, नांदेड यासह अनेक शहरांत काल मुस्लिम संघटनांनी मोर्चा काढला. या मोर्चाला मोठी गर्दी पाहायला मिळाली. दरम्यान, तिन्ही शहरांत मोर्चाला हिंसक वळण लागल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली असून आज अनेक संघटनांनी प्रति मोर्चा काढायला सुरुवात केलीय. त्रिपुरातील जातीय हिंसाचाराच्या घटना समोर आल्या असून त्याचा निषेध करण्यासाठी मुस्लिम संघटनांकडून अनेक भागांत बंद पाळण्यात येत आहे.

हेही वाचा: भाजपच्या 'अमरावती बंद'ला हिंसक वळण; जमावाकडून गाड्यांची तोडफोड

देसाई पुढे म्हणाले, अमरावतीत काही लोकांनी बंद पुकारलाय. मात्र, सकाळपासून पोलिस फिल्डवर तैनात करण्यात आले आहेत. जमावाला हटवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या घटनेच्या मुळीशी आम्ही जाणार असून जाणीवपूर्वक राज्यात अशांतता निर्माण करणाऱ्या, दगडफेक करणाऱ्यांना आम्ही शोधून काढू, तसे आदेशही आयजींना दिले आहेत. या घटनेचा लवकरच सोक्षमोक्ष लावू. यात जे-जे कायदा हातात घेत आहेत, दगडफेक करत आहेत, त्यांच्यावर कडक कारवाई करु, असा इशाराही त्यांनी दिलाय.

loading image
go to top