Tukaram Munde: तुकाराम मुंडेंचा वनवास संपला, मिळाली 'या' खात्याची जबाबदारी

तुकाराम मुंडे यांच्याकडे नवीन जबाबदारी सोपवण्यात आली आहे
Tukaram Munde News
Tukaram Munde NewsEsakal

राज्यात अधिकाऱ्यांची बदली होतच असते पण एक असं व्यक्तिमत्व जे फक्त त्यांच्या बदलीसाठी खास करून ओळखलं जातं ते म्हणजे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे. तुकाराम मुंडे यांच्या कार्यकाळात त्यांची बदली हा चर्चेचा विषय राहिला आहे. आत्तापर्यत 16 वर्षात 20 वेळा बदल्या झालेले एकमेव अधिकारी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं.

आयएएस आधिकारी तुकाराम मुंडे यांच्या बदलीला काही महिने उलटूनही नवी पोस्टिंग मिळाली नव्हती. आता तुकाराम मुंडे यांचा वनवास संपला आहे. राज्य सरकारने 10 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यामध्ये तुकाराम मुंडे यांच्याकडे नवीन जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

Tukaram Munde News
Death threats: पुण्यातील मनसे नेत्याच्या 16 वर्षीय मुलाला जीवे मारण्याची धमकी

आज राज्य सरकारने दहा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये जी श्रीकांत हे छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे नवे आयुक्त असणार आहे. तर, पी शिवशंकर हे शिर्डी संस्थानचे नवे सीईओ असणार आहेत. राज्यात आपल्या कामामुळे कायम चर्चेत असलेले तुकाराम मुंडे यांना अखेर नवीन जबाबदारी मिळाली आहे. कृषी आणि पशूसंवर्धन खात्याचे अतिरिक्त सचिव म्हणून तुकाराम मुंडे यांना जबाबदारी देण्यात आली आहे.

Tukaram Munde News
Sharad Pawar Resigns: सुप्रिया सुळेंचं ते वक्तव्य! १५ दिवसांत दोन राजकीय स्फोट; पहिला शरद पवारांची निवृत्ती अन् दुसरा?

मुंढेच्या बदलीचा विक्रम

तुकाराम मुंढे यांना वेळोवेळी बदलीला सामोरे जावे लागले आहे. मुंढे 2005 सालच्या आयएसएस बॅचचे अधिकारी आहे.

गेल्या 16 वर्षांच्या सेवेत मुंढेंची 20 पेक्षा जास्त वेळा बदली करण्यात आली आहे. त्यांच्या आक्रमक कार्यशैलीमुळे त्यांची प्रशासनात ओळख आहे.

Tukaram Munde News
Sharad Pawar Resigns: 'पवारांच्या निर्णयाचा देशपातळीवर परिणाम', काँग्रेसच्या बड्या नेत्याची प्रतिक्रिया

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com