तूर-हरभरा अनुदानाचे नवे निकष जारी 

तात्या लांडगे
शनिवार, 30 जून 2018

मुदत संपूनही माहिती प्राप्त नाही 
राज्यातील ज्या-ज्या शेतकऱ्यांनी तूर व हरभऱ्याची ऑनलाइन नोंदणी केली. परंतु, त्यांची खरेदी हमीभाव केंद्रांमार्फत झाली नाही, अशा शेतकऱ्यांची माहिती संबंधित जिल्हाधिकाऱ्यांमार्फत दिली जाणार आहे. त्याची मुदत उद्यापर्यंतच (शनिवार) आहे. तरीही बहुतांशी जिल्ह्यांची माहिती मार्केटिंग फेडरेशनकडे आलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना अनुदानासाठी आणखी काही दिवसांची प्रतीक्षा करावी लागेल, असे राज्य मार्केटिंग कार्यालयाकडून सांगण्यात आले.

सोलापूर : राज्यातील शेतकऱ्यांकडील तूर व हरभरा शासनामार्फत हमीभावाने खरेदी करण्यात आला. ज्या शेतकऱ्यांकडील तूर व हरभरा खरेदी झालेला नाही, अशांना शासनामार्फत प्रतिक्विंटल एक हजारांचे अनुदान दिले जाणार आहे. मात्र, शासनाने तयार केलेल्या निकषांमुळे राज्यातील सुमारे दोन लाख शेतकरी अनुदानापासून वंचित राहण्याची शक्‍यता आहे. 

तूर व हरभरा मुदतीत खरेदी न झालेल्या शेतकऱ्यांची संख्या तीन लाख 61 हजार 188 इतकी आहे. परंतु, हमीभाव केंद्रांमार्फत तूर व हरभरा विक्रीसाठी आणावा, असा मेसेज पाठवूनही संबंधित शेतकऱ्यांनी तो विक्रीसाठी आणला नाही, अशांना अनुदान मिळणार नाही. ज्या शेतकऱ्यांना मेसेजच पाठविण्यात आले नाहीत, त्यांनाच अनुदान दिले जाणार आहे. तसेच एका शेतकऱ्याला केवळ दोन हेक्‍टर क्षेत्राच्या अपेक्षित उत्पन्नानुसार 20 क्विंटलसाठीच अनुदान मिळणार आहे. या नव्या निकषांमुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांना अनुदान मिळणार नसल्याचे मार्केटिंग विभागाकडून सांगण्यात आले. 

आकडे बोलतात... 
(तूर) 
नोंदणी केलेले शेतकरी 
4,60,406 
खरेदी झालेले शेतकरी 
2,65,854 
खरेदी झालेली तूर 
33,67,177 क्‍विंटल 
शिल्लक शेतकरी 
1,94,552 
अंदाजित शिल्लक तूर 
19,73,628 क्‍विंटल 

(हरभरा) 
नोंदणी केलेले शेतकरी 
3,05,828 
खरेदी झालेले शेतकरी 
1,39,192 
खरेदी झालेला हरभरा 
19,47,262 क्विंटल 
शिल्लक शेतकरी 
1,66,636 
अंदाजित शिल्लक हरभरा 
17,32,820 क्‍विंटल 

मुदत संपूनही माहिती प्राप्त नाही 
राज्यातील ज्या-ज्या शेतकऱ्यांनी तूर व हरभऱ्याची ऑनलाइन नोंदणी केली. परंतु, त्यांची खरेदी हमीभाव केंद्रांमार्फत झाली नाही, अशा शेतकऱ्यांची माहिती संबंधित जिल्हाधिकाऱ्यांमार्फत दिली जाणार आहे. त्याची मुदत उद्यापर्यंतच (शनिवार) आहे. तरीही बहुतांशी जिल्ह्यांची माहिती मार्केटिंग फेडरेशनकडे आलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना अनुदानासाठी आणखी काही दिवसांची प्रतीक्षा करावी लागेल, असे राज्य मार्केटिंग कार्यालयाकडून सांगण्यात आले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: tur subsidy new rule by government