तुर्कीनेही घ्यावा किल्लारीचा आदर्श; जगातलं सर्वात मोठं पुनर्वसन केलं तेही विक्रमी वेळेत… | Turkey-Killari Earthquake | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

turkey earthquake How Sharad Pawar navigate emergency situation after killari earthquake lok maze sangati

Turkey Earthquake : तुर्कीनेही घ्यावा किल्लारीचा आदर्श; जगातलं सर्वात मोठं पुनर्वसन केलं तेही विक्रमी वेळेत…

पश्चिम आशियातील तुर्कीसह ४ देशांमध्ये (लेबनॉन, सीरिया आणि इस्रायल) भूकंपाने हाहाकार माजवला आहे. या भूकंपात आतापर्यंत ४ हजारांहून अधिक लोकांचा जीव गेला आहे जर हजारो लोक जखमी झाले आहेत.या विनाशकारी भूकंपानंतर महाराष्ट्रात झालेल्या भूकंपाची आठवण झाल्याशिवया राहत नाही.

महाराष्ट्राला देखील भूकंपाच्या जखमा…

३० सप्टेंबर १९९३ च्या पहाटेला लातूर जिल्ह्यातील किल्लारी येथे भूकंपाचे हादरे बसले आणि अख्खा महाराष्ट्र खडबडून जागा झाला. या भूकंपात झालेल्या जीवितहानी भीषण होती. यावेळी राज्याचे मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे होतं. यावेळी घडलेल्या घटनाक्रमाची सविस्तर माहिती पवारांनी त्यांच्या 'लोक माझे सांगती…' (Lok Maze Sangati) या पुस्तकात दिली आहे.

तीस तारखेच्या पहाटे भूकंप झाला, त्यानंतर तात्कालिन मुख्यमंत्री शरद पवार सकाळी ७.४० लातूरमध्ये पोहचले, तेथून गाडीने ते किल्लारीला निघाले. त्यांनी तिथं पोहचल्यावर पाहिलेल्या पहिल्या दृश्यांच वर्णन पवारांनी केलं आहे.

शरद पवारांनी लिहीलंय की, "तेथे जाऊन पाहतो तर गावातील सारी घरं जमीनदोस्त झाली होती.ढिगाऱ्याखालून माणसांच्या कण्हण्याचे आवाज ऐकू येत होते. अनेकजण झोपेतच मृत्यूच्या दाढेत सापडले होते. काही आडकलेले मृतदेह आम्ही आमच्या हातानंच बाहेर ओढून काढले…"

भूकंपानंतर महाराष्ट्र कसा सावरला…

शरद पवारांनी त्यांच्या पुस्तकात सागितलं की, त्यांनी आपत्कालिन परिस्थीती हाताळताना पहिल्यांदा सोलपूर, जालना, बीड, औरंगाबाद, नांदेड येथील जिल्हाधिकाऱ्यांना आणि उपजिल्हाधिकाऱ्यांना बोलवून घेतलं. त्यानंतर त्या सगळ्यांना एक-एका गावाची जबाबदारी सोपवली. भूकंपानंतर पाऊस सरु झाल्याने निवाऱ्याची सोय करण्यासाठी प्रत्येक गावातील पत्रे, आणि बांबू-कळक विकाणाऱ्या व्यापाऱ्यांचं सारं सामान मोबदला देऊन ताब्यात घ्यायला लावलं.

तसेच भूकेचा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी स्वयंसेवी संस्थांना येथे अन्नछत्र उघडायला सांगितले. जखमींच्या उपचारासाठी एक हजार वैद्यकिय पथकं बोलावून घेतली. त्यासाठी सार्वजनिक वाहनं ताब्यात घेतली.

मुख्यमंत्र्यांना स्वतःचा फ्रंटलाईनवर काम करता यावा याकरिता पवारांनी स्वतःचा मुक्काम सोलापूरला हलवला. यावेळी प्रशासकीय अधिकारी, नोकरशाहांचा सहभाग हा असाधरण होता ते या काळात वीस-वीस तास काम करीत होते असेही पवारांच्या पुस्तकात उल्लेख आहे. यावेळी हजारो राज्य राखीव पोलीस दल आणि लष्कराचे जवान मदतीसाठी तैनात होते.

सरकारकडून मुंबईत मुख्य सचिवांच्या नियंत्रणाखाली नियंत्रण कक्ष उभारला आणि मंत्रालय ते उमरगा किल्लारी अशी हॉटलाईन सुरू केली. बाहेर देशातून आलेल्या मदतीचे गरजवंताना व्यवस्थित वितरण व्हावं यासाठी यंत्रणा उभारण्यात आली.

आर्थिक मदतीचं नियोजन..

केंद्रीय अर्थमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांनी भूकंपग्रस्तांच्या निवाऱ्यासाठी जागतिक बँकेचं अर्थसाहाय्य मिळवून दिलं. जनतेकडून आलेला निधी न वापरता तो मुदतठेवीत गुंदवून त्या व्याजातून जागतिक बँकेचं कर्जफेड करण्यात आली.

निवाऱ्याची उभारणी..

निवारे उभारण्यासाठी रुरकीच्या आयआयटी तज्ञांच्या सल्ला घेण्यात आला. भूकंपप्रवण क्षेत्रात कशी घरं बांधायची याचा सल्ला घेण्यात आला. त्यानंतर ग्रामस्थांशी चर्चा करून आराखडा करण्यात आला आणि गावठाण वसवण्यात आले. यावेळी घराची प्रारुपं मागवून लोकांना त्यातून निवड करण्याची मुभा देण्यात आली.

जगातलं सर्वात मोठं पुनर्वसन तेही विक्रमी वेळेत..

अनेक राज्यांनी, स्वयंसेवी संस्थांनी,कॉर्पोरेट कंपन्यांनी, राजकीय पक्षांनी गावं दत्तक घेतल्यामुळे वर्षभरात साधारण एक लाख घरं बांधली गेली. लोकांचं कायमस्वरूपी पुनर्वसन झालं . हे जगातलं सर्वात मोठं पुनर्वसनाचं आव्हान आम्ही विक्रमी वेळेत पूर्ण केलं असे शरद पवार यांनी त्यांच्या पुस्तकात सांंगीतल आहे.

टॅग्स :EarthquakeSharad Pawar