esakal | बापूंना सावरकरांविषयी चिंता होती - तुषार गांधी
sakal

बोलून बातमी शोधा

Tushar Gandhi

बापूंना सावरकरांविषयी चिंता होती - तुषार गांधी

sakal_logo
By
ओमकार वाबळे

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर आता सर्व स्तरांतून प्रतिक्रिया येत आहेत. एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बोलताना, सावरकरांनी गांधीजींच्या सूचनेनुसार माफीनामा लिहिल्याचं वक्तव्य राजनाथ सिंह यांनी केलं. यानंतर संघ आणि गांधीजींच्या विचारांचा वारसा पुढे नेणाऱ्यांमध्ये सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस पडायला सुरुवात झाली.

यासंदर्भात गांधीजींचे पणतू तुषार गांधी यांनीही 'सकाळ'ला प्रतिक्रिया दिली आहे. बापूंना सावरकर यांच्या विषयी चिंता वाटत होती. त्यांना जमलं असतं तर, गोडसे यांना देखील शिक्षा होऊ नये, असंच पत्र बापूंनी लिहिलं असतं, अशी प्रतिक्रिया तुषार गांधी यांनी दिली. बापूंची करुणेची वृत्ती होती, असे ते म्हणाले.

सावरकरांनी माफी मागितली, हे आम्ही सांगत होतो. त्याला राजनाथ सिंह यांनी अखेर पुष्टी दिल्याबद्दल धन्यवाद, असे गांधी म्हणाले. तसेच नव्या इतिहासकारांचे स्वागत आहे, असे म्हणत त्यांनी खोचक टोला लगावला.

loading image
go to top