
जालन्यात दोन गटांमध्ये दगडफेक, शिवाजी महाराजांचा पुतळा काढण्यावरुन वाद
भोकरदन (जि. जालना) : भोकरदन (Bhokardan) तालुक्यातील चांधई एक्को गावात आज गुरुवारी (ता.१२) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा काढण्यावरुन दोन गटात हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. गावाच्या कमानीला गोपीनाथ मुंडे यांचे नाव देण्यात यावे. यावरुन दोन समाजामध्ये तुफान हाणामारी, जाळपोळ झाली आहे. अखेर शिवाजी महाराज (Shivaji Maharaj) यांचा पुतळा प्रशासनाने काढला आहे. एक गट गोपीनाथ मुंडे यांचे नाव गावाच्या कमानीला देण्यात यावे, अशी मागणी करत होता. (Two Groups Fight Each Other Over Shivaji Maharaj Statue In Jalna)
दुसरा गट छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव कमानीला कायम ठेवावे, अशी मागणी करत होता. शिवाजी महाराज यांचा पुतळा काढण्यासाठी आलेल्या जेबीसी व क्रेन यंत्रावर दगडफेक करण्यात आली आहे. (Jalna)
हेही वाचा: मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री ठाकरे बोलत असताना वीजपुरवठा खंडित...
पोलीस प्रशासनातर्फे जमावाला शांत करण्यासाठी अश्रुधुराचा वापर करण्यात आला. दुसरीकडे पोलिसांची अतिरिक्त कुमक मागवण्यात आली आहे. अग्निशमन दलाच्या साहाय्याने शिवाजी महाराज यांचा पुतळा काढण्यात आला आहे.
Web Title: Two Groups Fight Each Other Over Shivaji Maharaj Statue In Jalna
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..