esakal | 'लोकशाहीच्या पद्धतीने ममतादीदींनी भाजपाला चपराक दिली'

बोलून बातमी शोधा

uday samant
'लोकशाहीच्या पद्धतीने ममतादीदींनी भाजपाला चपराक दिली'
sakal_logo
By
प्रमोद सरवळे

औरंगाबाद: पश्चिम बंगालमध्ये आता ममता बॅनर्जींचा विजय जवळजवळ झाला आहे. याबद्दल राज्यातील अनेक नेत्यांनी दीदींना विजयाबद्दल शूभेच्छा दिल्या आहेत. त्यामध्ये आता मंत्री उदय सामंत यांनीही ममतादीदींच्या लढाऊ वृतीचे कौतूक करत अभिनंदन केलं आहे.

मंत्री सामंत बोलताना म्हणाले की, सुरुवातीला ममतादीदी एकट्या पडल्या असं वाटत होतं पण त्या सगळे आघात सहन करत दीदी लढल्या. या निवडणुकीकडे पूर्ण जगाचे लक्ष लागले होते. कोरोनाच्या काळात या निवडणूका होत होत्या. लोकशाहीच्या पद्धतीने ममतादीदींनी भाजपाला चपराक दिली आहे.'

हेही वाचा: 'मोदी-शहांच्या हट्टामुळे देश आज सरणावर'

'भाजपचं पश्चिम बंगालमधील यश मोठं आहे आणि ते कौतुकास्पदही आहे, कारण भाजपाने ८० जागापर्यंत मुसंडी मारली आहे. ही निवडणूक फक्त राज्याची नव्हती तर त्याकडे सगळ्या जगाचं लक्ष लागले होते, अशी प्रतिक्रियाही मंत्री उदय सामंतांनी दिली.