esakal | 'मोदी-शहांच्या हट्टामुळे देश आज सरणावर'
sakal

बोलून बातमी शोधा

modi and shaha

'मोदी-शहांच्या हट्टामुळे देश आज सरणावर'

sakal_logo
By
प्रमोद सरवळे

औरंगाबाद: सध्या देशातील पाचही राज्यांचे निकाल स्पष्ट होत आहे. पश्चिम बंगालच्या निकालाकडे सर्व देशाचे लक्ष होते. भाजपाने पश्चिम बंगालची सत्ता मिळवण्यासाठी सगळी फौज मैदानात उतरवली होती. भाजपाचे अनेक नेते बंगालमध्ये शड्डू ठोकून होते. काही वेळात स्पष्ट निकाल येतील.

एकीकडे देशात कोरोना कहर होत असताना देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री प्रचारात व्यस्त असल्याचे दिसले होते. मागील २४ तासांत देशात ४ लाखांपेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. यासंबंधी शिवसेनेचे नेते अरविंद सावंतानी पंतप्रधान मोदी आणि अमित शहांवर जोरदार टीका केली आहे.

हेही वाचा: 'भाजपच्या प्रचाराचे कौतूक पण ममताच सत्ता राखणार'

खासदार सावंत बोलताना म्हणाले की, मोदी आणि शहांच्या हट्टमुळे आज देश सरणावर गेला आहे. गरज नसताना निवडणूका करवून आणल्या आणि लाखो भाजपच्या कार्यकर्त्यांना त्यांनी बंगालमध्ये आणले होते. यामुळे आता तिथेही कोरोनाचे मोठे आकडे येत आहेत. जरी भाजपाने कितीही प्रयत्न केला असला तरी पश्चिम बंगालमध्ये तृणमूलच सत्तेवर येईल.'

हेही वाचा: 'हे सुरुवातीचे कल पण ममतांचा पराभव होणारच'

'भाजप प्रत्येक गोष्टीत राजकारण करत आहे. त्यामूळेच देशातील कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. देशाला या दोघांनी मृत्यूच्या खाईत लोटलं आहे, अशी टीकाही खा. अरविंद सावंतानी केली आहे.

loading image