'व्हर्च्युअल क्लासरूम संकल्पनेसोबत पाच विद्यापीठांत सॅटेलाइट सेंटर सुरू केले जाणार' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

uday samant

व्हर्च्युअल क्लासरूमच्या माध्यमातून तज्ज्ञ प्राचार्य, प्राध्यापकांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळेल, अशी माहिती उच्च व तत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी (ता. १२) येथे पत्रकार परिषदेत दिली

'राज्यातील पाच विद्यापीठांत सॅटेलाइट सेंटर सुरू केले जाणार'

हिंगोली: पारंपरिक शिक्षण पद्धतीसोबतच आगामी काळात व्हर्च्युअल क्लासरूमची संकल्पना पुढे आणली जाणार आहे. त्यानुसार उच्च व तंत्रशिक्षण विभागातर्फे राज्यातील पाच विद्यापीठांत सॅटेलाइट सेंटर सुरू केले जाणार आहे. त्याद्वारे व्हर्च्युअल क्लासरूमच्या माध्यमातून तज्ज्ञ प्राचार्य, प्राध्यापकांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळेल, अशी माहिती उच्च व तत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी (ता. १२) येथे पत्रकार परिषदेत दिली.

पारंपरिक शिक्षण पद्धतीवरच विश्वास आहेच. कोरोनामुळे ऑनलाइनचा पर्याय समोर आला. ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय जाणीवपूर्कक नाही. मात्र ऑनलाइन प्रगत शैक्षणिक सुविधा असलीच पाहिजे. त्यामुळे आगामी काळात पारंपरिक शिक्षणासोबतच व्हर्च्युअल क्लासरूमची संकल्पना पुढे आणली जाणार आहे. यासाठी पुणे, मुंबई, औरंगाबाद, गोंडवाना, नागपूर येथील विद्यापीठांत सॅटेलाइट सेंटर सुरू केले जाणार आहे, असे सावंत म्हणाले.
आमदार संतोष बांगर, आमदार बालाजी कल्याणकर, प्रभारी जिल्हाधिकारी शंकर बरगे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सूर्यवंशी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, डॉ. गोपाल कदम, प्रशांत तुपकरी आदी उपस्थित होते.

हेही वाचा: काहीतरी वेगळं करून दाखवण्याचं धाडस 'उद्धव' नावामध्ये- उदय सामंत

प्राध्यापकांच्या जागा भरणार-
राज्यात प्राध्यापकांच्या चार हजार ६०० जागा भरण्याचा प्रस्ताव होता. त्यापैकी कोरोनापूर्वी एक हजार ६०० जागा भरल्या आहेत. त्यानंतर तीन हजार ७४ प्राध्यापकांच्या जागा भरण्यासाठीचा प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठविण्यात आला. कोरोनामुळे त्यावर निर्णय झाला नाही. कोरोना लाट कमी झाल्यानंतर या जागा भरल्या जातील, असे सामंत यांनी सांगितले. राज्यात शैक्षणिक सुविधा वाढविणार असून त्या तुलनेत प्राध्यापकांची संख्याही वाढवली जाणार आहे. त्यावर सरकार काम करीत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Uday Samant Satellite Centers Will Set Up Five Universities Hingoli

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Hingoli