काहीतरी वेगळं करून दाखवण्याचं धाडस 'उद्धव' नावामध्ये- उदय सामंत

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजना कोविड योद्धांच्या सत्कार समारंभ प्रसंगी ते बोलत होते
nanded
nandednanded
Summary

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजना कोविड योद्धांच्या सत्कार समारंभ प्रसंगी ते बोलत होते

नांदेड: स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील कोविड लॅब ही देशातील आदर्श लॅब झाली आहे. हे धाडस उद्धव नाव असणाऱ्या व्यक्ती करू शकतात मग ते राज्याचे नेतृत्व असो की विद्यापीठाचे नेतृत्व असे म्हणत स्वतःची जीवाची बाजी लावून कार्य करणाऱ्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांचे कौतुक करताना आनंद होत असल्याची भावना उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केली. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजना कोविड योद्धांच्या सत्कार समारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.उद्धव भोसले, आमदार मोहन हंबर्डे, आमदार बालाजी कल्याणकर, प्र. कुलगुरू डॉ.जोगेंद्रसिंह बिसेन, उच्च शिक्षण सह संचालक डॉ. विठल मोरे, कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे,रासेयो संचालक डॉ. शिवराज बोकडे उपस्थित होते.

पुढे मंत्री सामंत म्हणाले, ज्यांच्या अंगी पालकांनी आपल्या मुलांना संस्कार दिले त्या संस्कारक्षम विद्यार्थ्यांचे कौतुक झालेच पाहिजे. नव्या पिढीसमोर कोरोना योद्धाचा आदर्श ठेवण्यासाठी त्यांच्या कार्याचा गौरव करणे महत्वाचे आहे. कोरोना होऊ नये म्हणून घराच्या बाहेर न पडणारी माणसे होती अशा वेळी याच कोरोना योद्ध्यांनी महत्त्वपूर्ण कार्य केले. आपण समाजाचे देणे लागतो ही भावना राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी दाखवून दिली. त्यामुळे त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकने महत्वाचे आहे. यामुळे अन्य विद्यार्थी या प्रवाहात सामील होतील. यासाठी मी राज्यभर दौरा करणार असून याची सुरुवात स्वारातिम विद्यापीठातून करत आहे.

nanded
PM Kisan: उस्मानाबादमध्ये शेतकऱ्यांना त्रास; प्रशासन तोडगा काढण्यात अपयशी

महाविद्यालय व विद्यापीठ स्तरावर कुठल्या कार्यक्रमाची सुरुवात व शेवट हा राष्ट्रगीताने झाली पाहिजे असा महत्वाचा निर्णय घेतला असल्याचे म्हणत प्रत्येक महाविद्यालयातून शिवज्योत रॅली काढण्याचा आणि शिवराज्य दिवस साजरा करण्याचे ठरवले असल्याचे सांगितले. कुठल्याही आर्थिक तरतुदीची गरज नसल्याचे सांगत छत्रपती शिवरायांचा संदेश राज्यभर पोहोचला जाईल असे हे माझे मत आहे. नांदेड विद्यापीठात अण्णाभाऊ साठे अधिवेशन केंद्र लवकरात लवकर सुरू होईल, शिवाय एनसीसीचे युनिटही विद्यापीठात सुरू करण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.

nanded
औरंगाबाद विभागात नवीन शाळांना मान्यतेसाठी तब्बल ४२० प्रस्ताव

विद्यापीठाला जास्तीत जास्त विकास यादृष्टीने प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले.
कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी प्रास्ताविक केले. यावेळी त्यांनी केंद्रीय पातळीवर इन्स्ट्रुमेंट प्रयोगशाळा सुरू करण्यासाठी मदत करावी आणि औंढा नागनाथ येथील जागतिक चौथी लिगो संस्थेतील मनुष्यबळ लवकर उपलब्ध करून द्यावी जेणेकरून विद्यार्थ्यांना संशोधनास मदत होईल. अशी अपेक्षा व्यक्त केली. प्र. कुलगुरू डॉ.जोगेंद्रसिंह बिसेन यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन डॉ.पृथ्वीराज तौर यांनी केले. यावेळी व्यवस्थापन परिषद सदस्य सिनेट सदस्य अधिकारी कर्मचारी विद्यार्थी यांची उपस्थिती होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com