
विरोधी पक्ष त्यांचं आरोप प्रत्यारोपाच काम करत आहेत.
राणा दाम्पत्या विरोधात मातोश्री बाहेर पहारा देणाऱ्या आजींची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब भेट दिली आहे. 92 वर्षीय चंद्रभागा शिंदे यांच्या शिवडी येथील घरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे आले. दरम्यान, या भेटीवरून ठाकरे कुटुंबियांवर सध्या निशाणा साधला जात आहे. दरम्यान, आता शिवसेना नेते उदय सामंत यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. विरोधी पक्ष त्यांचं आरोप प्रत्यारोपाच काम करत आहेत. मुख्यमंत्र्यांनी आजींच्या कुटुंबियांना जो शब्द दिला आहे तो ते पूर्ण करतील, असा विश्वास सामंत यांनी व्यक्त केला आहे.
यावेळी किरीट सोमय्यासंदर्भात सामंत म्हणाले, सोमय्या हे केंद्रीय गृहसचिवांना भेटून आले आहेत. त्यांच्या शिष्ठामंडळाने केंद्रातल्या सचिवांना निवेदन दिलं आहे. मुंबई पोलिस आयुक्तही याबाबत अधिकची चौकशी करत आहेत. राज्यातील ऑनलाईन परिक्षां बद्दल विचारले असता ते म्हणाले, विद्यापीठाच्या कुलगुरुंनी आदेश दिले आहेत की परीक्षा ऑनलाईन घ्यायच्या आहेत. राज्यसरकारला कुलगुरूंनी घेतलेला निर्णय मान्य असल्याने आम्ही यावर ठाम आहोत. जुन महिन्यात परीक्षा होतील, असेही त्यांनी सांगितले.
5 वर्षांनंतर विद्यार्थ्यांचा एनएसएस हा कौतुक सोहळा पार पडत आहे. कोरोना काळात हे शक्य झालं नाही, मात्र आता आम्ही त्यांचं कौतुक करत आहोत. राज्याच्या सर्वपक्षीय बैठकी बाबत ते म्हणाले, त्याबाबतीत गृहमंत्री बोलले असून मी बोलणं जास्त उचित राहणार नाही.