Barsu Refinery Protest : उदय सामंतांनी २०२१ मध्ये रिफायनरीला केला होता विरोध ; ठाकरे गटाचा आरोप

Barsu Refinery Protest
Barsu Refinery Protest
Updated on

Uday Samant : रत्नागिरी रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स प्रकल्पाला (आरआरपीएल) महाराष्ट्रातील रत्नागिरीत विरोध सुरू झाला आहे. या प्रकल्पासाठी माती परीक्षणाचे काम सुरू आहे. याच्या निषेधार्थ सुमारे सहा गावांतील ५०० हून अधिक लोक रस्त्यावर उतरले. दरम्यान या प्रकल्पावरुन ठाकरे गट विरूद्ध शिंदे-फडणवीस सरकार असा वाद निर्माण झाला आहे.

दरम्यान ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी आंदोलक कार्यकर्त्यांची भेट घेतली यावेळी त्यांनी फडणवीसांवर हल्लाबोल केला. भूमिपुत्रांचा आवाज दाबण्यासाठी महाराष्ट्रभरातून पोलीस आले आहे. पोलीस अधिक्षक देखील तळ ठोकून बसले आहेत. ग्रामस्थांचा आवाज दाबल्या जात आहे. शिंदे सरकारच्या कारभारात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमत्री उदय सामंत यांच्या खात्यामार्फत दमनशाही सुरू आहे, असे चित्र आम्ही कोकणात कधीही पाहीली नाही, असे राऊत म्हणाले.

Barsu Refinery Protest
Karnataka Election : राष्ट्रवादीचं 'घड्याळ' आधीच बंद पडलंय; जाहीर सभेत स्मृती इराणींचा शरद पवारांना टोला

या रिफायनीला विरोध करणाऱ्यांनी सरकारला निवेदन दिले आहेत. मात्र त्यांच्या निवेदनाची दखल घेण्यात आली नाही. पालकमंत्री उदय सांमत उद्योगमंत्र्यांच्या काळात अनेक उद्योग बाहेर गेले आहेत. त्यांनी उद्धव ठाकरे यांचे एक पत्र दाखवून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र माझ्या त्यांनी प्रश्न आहे ते त्यांच्या पापाच खापर आमच्यावर फोडत आहेत, असे विनायक राऊत म्हणाले.

विनायक राऊत म्हणाले, उदय सामंत यांनी २०२१ मध्ये मंत्रिपदावार असताना ही रिफायनरी कशी विनाशकारी आहे, हे जाहीर व्यासपीठावरुन सांगितले आहे. मोठे प्रकल्प तुम्ही राज्यातून पळून लावले. उद्धव ठाकरे सरकारने प्रस्तावित केलेले प्रकल्प राज्याबाहेर पाठवले, जनाची नाही तर मनाची वाटली पाहीजे.

Barsu Refinery Protest
CM Maharashtra: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाबाबतच्या चर्चांवर शरद पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले, हा वेडेपणा...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com