...म्हणून मी पक्ष बदलला; उदयनराजे पत्रकारांवर भडकले (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 6 October 2019

'काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत तुम्ही नरेंद्र पाटील यांच्याविरोधात निवडणूक लढवली. आता मात्र तुम्ही दोघे एकत्र दिसत आहात,' असं म्हणत एका पत्रकाराने उदयनराजेंना पक्षांतराविषयी प्रश्न विचारला. या प्रश्नावर उत्तर देताना उदयनराजे भडकले आणि 'मी कोणत्या पदासाठी पक्ष सोडला नाही तर साताऱ्याच्या विकासासाठी आणि लोकांसाठी पक्ष सोडला आहे,' असं उदयनराजे यांनी यावेळी स्पष्ट केले.

सातारा : 'काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत तुम्ही नरेंद्र पाटील यांच्याविरोधात निवडणूक लढवली. आता मात्र तुम्ही दोघे एकत्र दिसत आहात,' असं म्हणत एका पत्रकाराने उदयनराजेंना पक्षांतराविषयी प्रश्न विचारला. या प्रश्नावर उत्तर देताना उदयनराजे भडकले आणि 'मी कोणत्या पदासाठी पक्ष सोडला नाही तर साताऱ्याच्या विकासासाठी आणि लोकांसाठी पक्ष सोडला आहे,' असं उदयनराजे यांनी यावेळी स्पष्ट केले.

उदयनराजे भोसले यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. सातारा विधानसभा निवडणुकीत उदयनराजेंनी राष्ट्रवादीच्या तिकीटावर विजय मिळवला होता. सातारा मतदारसंघात आता पोटनिवडणूक होत आहे. यावेळी भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या उदयनराजेंसमोर राष्ट्रवादीचं मोठं आव्हान आहे.
 

दरम्यान, उदयनराजेंना राष्ट्रवादीकडून सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांचे तगडे आव्हान आहे. 21 ऑक्टोबर रोजी सातारा विधानसभा निवडणुकीसोबत सातारा लोकसभेचीही निवडणुक होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: udayanraje bhosale reaction on Changes party politics