माईंनी अनाथांसाठी आयुष्यभर कष्ट घेतलं; उदयनराजेंसह साताऱ्यातील नेत्यांनी व्यक्त केलं दु:ख I Sindhutai Sapkal | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Udayanraje Bhosale

'माईंनी अनाथ मुलांना आधार देत त्यांना आपल्या पायावर उभं करण्यासाठी आयुष्यभर कष्ट घेतलं.'

Sindhutai Sapkal : 'माईंनी अनाथांसाठी आयुष्यभर कष्ट घेतलं'

सातारा : अनाथांची माय अशी ओळख असलेल्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ (Sindhutai Sapkal) यांचं काल (मंगळवारी) रात्री निधन झालं. वयाच्या ७४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर पुण्यातील गॅलक्सी रूग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्यावर काही दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया देखील झाली होती,” अशी माहिती डॉ. शैलेश पुणतांबेकर यांनी दिली. माईंच्या या निधनाबद्दल साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी दु:ख व्यक्त केलंय. उदयनराजेंसह खासदार श्रीनिवास पाटील, पालकमंत्री बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil), गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai), आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी माईंना श्रध्दांजली वाहिलीय.

माईंच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करताना उदयनराजे म्हणाले, 'अनाथांची माय' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांनी आजपर्यंत अनाथ मुलांना आधार देत त्यांना आपल्या पायावर उभं करण्यासाठी आयुष्यभर कष्ट घेतलं. अतिशय खडतर असं आयुष्य त्या जगल्या. त्यांच्या या कार्याचा कृतज्ञतापूर्वक आदर करीत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असं दु:ख व्यक्त केलंय.

हेही वाचा: Sindhutai Sapkal Dies: अनाथांच्या माय सिंधुताई सपकाळ यांचं पुण्यात निधन

खासदार पाटील (Shrinivas Patil) यांनी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताईंचं निधन अतिशय दुःखद आहे. अनाथ मुलांना सांभाळून त्यांच्या शिक्षणापासून आर्थिक स्वावलंबनापर्यंत मोलाचं काम केलंय. स्वतः संघर्षमय जीवन जगून देखील त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य अनाथांसाठी समर्पित केलं. त्यांचे मानवतेचे कार्य कायम स्मरणात राहिल. त्यांच्या निधनामुळं ‘अनाथांची माय’ हरपली, असं देखील पाटील यांनी म्हंटलंय.

आमदार शिवेंद्रसिंहराजे (Shivendrasinharaje Bhosle) म्हणाले, अनाथ मुलांना आधार देत त्यांना आपल्या पायावर उभं करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर काम केलं. अतिशय खडतर असं आयुष्य त्या जगल्या. पण, या संघर्षातून त्यांनी अनाथ, दु:खी, कष्टी जनांच्या आयुष्याला आधार दिला, असं म्हणून त्यांनी दु:ख व्यक्त केलंय. अनाथ मुलांसाठी आयुष्यभर अविरत सेवाकार्य करणाऱ्या ज्येष्ठ समाजसेविका पद्मश्री सिंधुताई यांच्या निधनामुळं अनाथांची माय हरपलीय. त्यांनी अनेक अनाथ मुलांना वाढवलं, शिक्षण दिलं, जगण्याची प्रेरणा दिली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, समाजात मानाचं स्थान मिळवून दिलं असल्याचे म्हणत गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी माईंच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलंय.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top