

सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानार्थ शिवरायांचे वंशज आणि भाजप खासदार उदयनराजे भोसले हे आत्मक्लेश करणार आहेत. यासाठी शिवरायांचं समाधीस्थळ असलेल्या रायगडावर जाणार आहेत. यासाठी त्यांनी 'निर्धार शिवसन्मानाचा' या मेळाव्याचं आयोजन केलं आहे. साताऱ्यात पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली. (Udayanraje Bhosale will going to Raigad for Shivaji Maharaj honor)
उदयनराजे म्हणाले, मी माझ्या उदयन या नावापुढं राजे लावतो कारण हे छत्रपती शिवाजी महाराजांमुळं आम्हाला सन्मान मिळाला. त्यामुळं हा केवळ त्यांचाच अपमान नाही, अनेक महापुरुषांची देखील काही लोक अपमान करत आहेत. हा अपमान मी कदापी सहन करु शकत नाही आणि का करावा? असा सवालही त्यांनी यावेळी केला.
रायगडावर 'निर्धार शिवसन्मान' मेळाव्याचं आयोजन
कुठल्याही चांगल्या कार्याला सुरुवात करताना आपण शिवाजी महाराज आणि महारापुषांची नाव घेतो आणि त्यांच्यावरच अशी चिखलफेक होत असेल तर ही अत्यंत गंभीर बाब आहे. त्यामुळं आमच्या वेदना मांडण्यासाठी आम्ही आता रायगडाकडं निघालो आहोत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीस्थळी आम्ही 'निर्धार शिवसन्मानाचा' या मेळाव्याचं आयोजन केलं आहे.
हेही वाचाः आरामात फेडू शकाल अशीच घ्या कर्जे....
आपण कोडके झालो आहोत का?
जग इतकं व्यक्तीकेंद्रीत झालं आहे की त्याच्यापुढं कोणाला काहीही दिसतं नाही. आपण इतके कोडके झाले आहोत का? शिवाजी महाराजांचा सन्मान म्हणजे सर्व महापुरुषांचा सन्मान आहे. याप्रकरणी आपल्याला मुख्यमंत्र्यांचा आणि इतर कोणाचाही फोन आलेला नाही. कोणीही माझ्याशी बोललेलं नाही आणि मी कोणाच्या फोनची वाटंही बघत नाही. त्यांना जे योग्य वाटतंय ते करतात आणि मला जे वाटतं ते मी करतोय, अशा तीव्र शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त करत सत्ताधाऱ्यांवरही नाराजी व्यक्त केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.