राष्ट्रवादी तीनही राजेंना गमावणार; उदयनराजे भाजपच्या वाटेवर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 ऑगस्ट 2019

- उदयनराजे भाजपच्या वाटेवर 
- मुख्यमंत्र्याची घेतली भेट 
- राष्ट्रवादीला जबरदस्त हादरा 

मुंबई: राष्ट्रवादीचे बाहुबली नेते खासदार छत्रपती उदयनराजे भोसले भारतीय जनता पक्षाच्या वाटेवर असून आज (ता.20) त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. 

राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्र राजे यांनी या अगोदरच भाजप प्रवेश केला असून रामराजे निंबाळकरदेखील लवकरच भाजपमधे जाणार आहेत. मात्र, उदयनराजे यांनीही राष्ट्रवादीला सोडण्याचा निर्णय घेत शरद पवार यांना मोठा धक्का दिला आहे. 

पश्चिम महाराष्ट्रातील पुर परिस्थीती बाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचे उदयन राजे यांनी सांगितले. मात्र, आजच चार वाजता शरद पवार यांनी पश्चिम महाराष्ट्रातील काही नेत्यांसोबत मुख्यमंत्र्याची भेट घेतली. त्यावेळी उदयनराजे हजर नव्हते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Udaynraje Bhonsale may enters in BJP meet Cm Devendra Fadanvis