
थोडक्यात
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे 20 वर्षांनंतर एकत्र आले, महाराष्ट्राचे स्वप्न साकारण्यासाठी योग्य वेळी निर्णय घेणार.
मराठी माणसांसह हिंदी, गुजराती, आणि मुस्लिम समाजालाही ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याचा आनंद, काहींना पोटशूळ असले तरी त्याकडे दुर्लक्ष.
मराठी भाषा, महाराष्ट्र धर्म आणि मराठी माणसासाठी एकत्र काम करण्याची उद्धव ठाकरेंची तयारी, राजकीय युतीचा लोकांचा रेटा.
आम्ही ठाकरे बंधू एकत्रच आहोत. राज ठाकरे यांना मी कधीही भेटू शकतो. कुणाला काही प्रॉब्लेम आहे का? असा सवाल शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. राज आणि मी 20 वर्षांनी एकत्र आलोय, कोणाला पोटशूळ झालाच असेल तर होऊ द्या. आम्ही दोघे महाराष्ट्राचे स्वप्न साकार करू, योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.