Aaditya Thackeray : आदित्य ठाकरेंसाठी 'उद्धवसेना' उद्या नागपुरात धडकणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aaditya Thackeray

Aaditya Thackeray : आदित्य ठाकरेंसाठी 'उद्धवसेना' उद्या नागपुरात धडकणार

नागपूरः दिशा सालियन प्रकरणामध्ये सत्ताधाऱ्यांनी आदित्य ठाकरेंना घेरलं होतं. मात्र आता अधिवेशनाचा दुसऱ्या आठवड्यात वादळ उठणार असल्याची चिन्हं आहेत.

उद्या आदित्य ठाकरेंसाठी उद्धव ठाकरे यांच्यासह संजय राऊत, मिलिंद नार्वेकर नागपूरमध्ये येणार आहे. संजय राऊत उद्या या प्रकरणामध्ये गौप्यस्फोट करणार आहेत, त्यांनीच याबाबत माहिती दिली.

हेही वाचा - Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

आज नवी मुंबईमध्ये बोलतांना संजय राऊत म्हणाले की, आम्ही उद्या नागपूरमध्ये बॉम्ब फोडणार आहोत. आमची सेना बुलंद आहे. फेब्रुवारीनंतर हे सरकार दिसणार नाही, तोपर्यंत तुम्ही काहीही करा, असा इशारा राऊतांनी दिला.

हेही वाचा: 50 वर्षांची बायको आणि 60 वर्षांचा नवरा हौसेने हनिमूनला गेले.. हॉटेलमध्ये जाताच बायको लागली रडायला

दिशा सालियन प्रकरणावरुन उद्या सभागृहात आणि सभागृहाबाहेर वादळ येणार, हे दिसून येतंय. दरम्यान, दिशा सालियान मृत्यू प्रकरणात सीबीआयने भूमिका स्पष्ट केली आहे. या प्रकरणाचा तपास आमच्याकडे सोपवण्यात आला नसल्यामुळे संबंधित प्रकरणाचा तपास करत नसल्याचे स्पष्टीकरण केंद्रीय गुन्हे अन्वेषण म्हणजेच सीबीआयने दिले आहे.

त्यातच आदित्य ठाकरे या प्रकरणी कायदेशीर लढाई लढणार असल्याची माहिती आहे. ज्या लोकांनी आदित्य ठाकरेंवर आरोप केले आहेत त्यांच्याविरोधात ते अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचं सांगितलं जात आहे.