काळ्या टोपीच्या सडक्या मेंदूमागे कोण? याचा शोध घ्यावा लागेल; ठाकरेंची भाजपवर जहरी टीका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Uddhav Thackeray, Bhagatsinh Koshyari and Devendra Fadnavis

काळ्या टोपीच्या सडक्या मेंदूमागे कोण? याचा शोध घ्यावा लागेल; ठाकरेंची भाजपवर जहरी टीका

मुंबई - महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी केलेल्या विधानावर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी संताप व्यक्त केली. तसेच महाराष्ट्रातील महापुरुषांबाबत वादग्रस्त विधाने करायला लावणाऱ्यांमागे कोणाचा मेंदू आहे, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

मागील काही दिवसांपासून सातत्याने महाराष्ट्राचा आणि महराष्ट्रातील महापुरुषांचा अपमान होत आहे. महाराष्ट्रात मिंधे सरकार आणि खोके सरकार आल्यापासून महाराष्ट्राच्या अस्मितेवर हल्ले होत आहे. आम्ही फक्त छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून गप्प बसणार नाही. मात्र महापुरुषांचा अपमान झाल्यानंतर सत्ताधाऱ्यांकडून गुळगुळीत प्रतिक्रिया देण्यात येते, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केली.

हेही वाचा: Rajasthan : भारत जोडो पोहोचण्याआधीच काँग्रेसमध्ये वाद; गेहलोत म्हणाले पायलट गद्दार...

आपल्या देशाच्या कायदेमंत्र्यांनी देशाच्या न्यायालयातील न्यायमूर्तींच्या नेमणूकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. न्यायमूर्ती नेमणूकीचे अधिकार पंतप्रधानांकडे असावे, असंही कायदेमंत्री म्हणाले. दुसरं म्हणजे, न्यायमूर्ती यांनी निवडणूक आयुक्तांवर मोठं विधान केलं. देशाला निवडणूक आयुक्त सेशन यांच्यासारखा हवा आहे, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं, याची आठवण उद्धव ठाकरे यांनी करून दिली.

यावेळी राज्यपालांच्या निवडीवर उद्धव ठाकरे यांनी हल्लाबोल केला. ते म्हणाले की, राज्यपाल हे राष्ट्रपतीचे दूत असतात. मात्र ज्यांना वृद्धाश्रमातही जागा मिळत नाही, त्यांना राज्यपाल बनवून पाठवतात.

दरम्यान राज्यपाल यांनी आधीची वादग्रस्त विधाने केली. छत्रपती जुने आदर्श होते, असं राज्यपाल म्हणाले. बाप हा बापच असतो. तो जुना आणि नवा नसतो. छत्रपती आमचं दैवत आहे. मात्र हे विधाने केवळ राज्यपालांच्या काळ्या टोपोतून आलेले नाहीत. त्यांच्या सडक्या मेंदूच्या मागे कोण आहे, याचा शोध घ्यावा लागेल, असंही उद्दव ठाकरे यांनी म्हटलं.