Rajasthan : भारत जोडो पोहोचण्याआधीच काँग्रेसमध्ये वाद; गेहलोत म्हणाले पायलट गद्दार...

sachin pilot and ashok gehlot
sachin pilot and ashok gehlot

नवी दिल्ली - राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा संयम सुटल्याचं पाहायला मिळालं आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांच्यासोबत प्रचारासाठी गुजरातमध्ये आलेल्या अशोक गेहलोत यांनी एनडीटीव्हीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यावर अत्यंत वाईट शब्दांत टीका केली. तसेच संपूर्ण संभाषणादरम्यान त्यांना सहा वेळा 'गद्दार' म्हटले. (sachin pilot is gaddaar will never become cm says ashok gehlot)

अशोक गेहलोत म्हणाले, "गद्दार मुख्यमंत्री बनू शकत नाही... सचिन पायलट यांना हायकमांड मुख्यमंत्री बनवूच शकत नाही... त्यांनी पक्षाशी गद्दारी केली, ते देशद्रोही आहे..."

sachin pilot and ashok gehlot
Eknath Shinde: CM शिंदे यांनी भविष्य पाहिल्याच्या चर्चेवर केसरकरांनी दिलं स्पष्टीकरण

गेहलोत पुढं म्हणाले 'गद्दार मुख्यमंत्री होऊ शकत नाही... सचिन पायलट यांना हायकमांड मुख्यमंत्री करू शकत नाही, 10 आमदारही नाहीत अशी व्यक्ती... बंड करणारा माणूस... त्यांनी पक्षाशी गद्दारी केली, तो देशद्रोही आहे..."

मुलाखतीदरम्यान अशोक गेहलोत यांनी 2020 मध्ये झालेल्या 'बंडा'वर सविस्तर माहिती देताना सांगितलं की, "भारतात पहिल्यांदाच असं घडलं असावं, जेव्हा एखाद्या पक्षाध्यक्षाने स्वत:चं सरकार पाडण्याचा प्रयत्न केला होता..." त्यावेळी दोन वर्षे राजस्थानचे उपमुख्यमंत्री असलेले सचिन पायलट १९ आमदारांना घेऊन दिल्लीजवळच्या पंचतारांकित रिसॉर्टमध्ये पोहोचले. काँग्रेसपुढे ते थेट आव्हान होतं. पायलट यांना मुख्यमंत्री करा, नाहीतर ते काँग्रेस सोडून जातील, अशी मागणी करण्यात आली होती.

हेही वाचा: मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

sachin pilot and ashok gehlot
Uniform Civil Code: 2024 पर्यंत राज्यांनी 'समान नागरी कायदा' लागू न केल्यास...; शहांचा थेट इशारा

दरम्यान या बंडाच्या वेळी गेहलोत यांनी अत्यंत सहजतेने पायलट यांना शह दिला होता. गेहलोत यांनीही १०० हून अधिक आमदारांना पंचतारांकित रिसॉर्टमध्ये नेऊन आपली ताकद दाखवून दिल्याने हे आव्हान अपयशी ठरले होते. या अपयशानंतर त्याचे परिणाम सचिन पायलट यांना भोगावे लागले. करार झाला आणि दंड म्हणून त्यांना केवळ पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदावरूनच नव्हे तर उपमुख्यमंत्रीपदावरूनही हटवण्यात आले.

अशोक गहलोत यांनी आरोप केला की, बंडाच्या वेळी सचिन पायलट यांनी दोन वरिष्ठ केंद्रीय मंत्र्यांची भेट घेतली होती. "अमित शाह आणि धर्मेंद्र प्रधान यांचा सहभाग होता... दिल्लीत त्यांच्यात बैठक झाली. एवढच नाही तर सचिन पायलट सोबत असलेल्या काही आमदारांना 5 कोटी रुपये मिळाले, कोणाला 10 कोटी रुपये मिळाले... आणि प्रत्यक्षात ही रक्कम दिल्लीतील भाजप कार्यालयातून उचलण्यात आली होती..."

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com