मोदींनी राशन दिलं, पण फडणवीस साहेब ते शिजवायचे की कच्चे खायचे?: उद्धव ठाकरे | Uddhav Thackeray | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Uddhav Thackeray

मोदींनी राशन दिलं, पण फडणवीस साहेब ते शिजवायचे की कच्चे खायचे?: उद्धव ठाकरे

कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोरगरिबांना मोफत राशन दिले, असे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितले. राशन दिले. पण फडणवीस साहेब ते शिजवायचे की कच्चे खायचे?, असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी फडणवीस यांना केला. आज रविवारी (ता.दहा) उत्तर कोल्हापूर पोटनिवडणुकीचे काँग्रेस उमेदवार जयश्री जाधव यांच्या प्रचारार्थ आयोजित ऑनलाईन सभेत ठाकरे बोलत होते. ते म्हणाले, राशन दिलं. पण जनतेच्या पैशातून दिलं. दिलेलं राशन कसं शिजवायचं हे सांगत नाहीत, असा टोला ठाकरे यांनी महागाईवरुन फडणवीसांना लगावला. पेट्रोल-डिझेल दरावरुनही त्यांनी भाजपचा (BJP) समाचार घेतला. (Uddhav Thackeray Attacks On Devendra Fadnavis Over Ration Scheme)

हेही वाचा: अजित पवारांनी तातडीने थांबवला आपला ताफा, अपघातातील जखमीला केली मदत

आम्ही दर कमी करायचे आणि तुम्ही वाढवत जायचं. हक्काच जीएसटीचा हिस्सा देत नाहीत, असा आरोप त्यांनी मोदी सरकारवर केला. बेळगाव महापालिकेवरील भगवा झेंडा तुम्ही उतरवला. तुमचा भगवा झेंडा नकली आहे. आमच्या नादी लागू नका, असा ठाकरे यांनी भाजपला सुनावले.

हेही वाचा: Aurangabad| किर्तनकार 'बाबाचा अश्लील व्हिडिओ' व्हायरल, वारकरी संप्रदाय आक्रमक

ना भाषेचा, ना शिवरायाचा अभिमान, असे म्हणत त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली. तुम्ही आम्हाला भाषा प्रेम शिकवणार का ? जिकडे जाल तिकडचेच होतात, असा हल्लाबोल त्यांनी पाटील यांच्यावर केला. हो शिवसैनिक काँग्रेसला (Congress Party) मतदान करणार, या शब्दात उद्धव ठाकरे यांनी भाजपला सुनावले.

Web Title: Uddhav Thackeray Attacks On Devendra Fadnavis Over Ration Scheme

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top