
Uddhav Thackeray : २०२४ मध्ये उद्धव ठाकरे पंतप्रधान पदाचा चेहरा असतील? ; ठाकरे गटाच्या नेत्याचं मोठं वक्तव्य!
उद्धव ठाकरे यांनी काल खेड येथे सभा घेतली. या सभेत उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे, नरेंद्र मोदी, अमित शाहांवर घणाघात केला. दरम्यान राष्ट्रीय राजकारण आणि उद्धव ठाकरे यावर खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. २०२४ मध्ये उद्धव ठाकरे पंतप्रधान पदाचा चेहरा असतील का?, असा प्रश्न संजय राऊत यांना विचारण्यात आला.
संजय राऊत म्हणाले, देशाच्या राजकारणात खऱ्या शिवसेनेने भूमिका बजावली आहे. संसदेमध्ये आमची खासदारांच्या संख्येला महत्व आहे. अनेक वेळा शिवसेनेने हाती घेतलेले विषय राष्ट्रीय राजकारणात चर्चिले जातात. आमचं नेतृत्व कमी नाही. शिवसेनेचे नेते एकाकी लढतात. देशभरातील प्रमुख नेते आदित्य ठाकरे भेटत आहेत. देशभरातील नेते मातोश्रीवर येऊन भविष्यातील राष्ट्रीय राजकारणावर संवाद करतात. आम्ही सर्व एकत्र आलो तर पुढील लढाई सोपी जाईल.
२०२४ च्या निवडणुकीत शिवसेना जास्त जागा जिंकेल. राष्ट्रीय राजकारणात आमचा दबदबा कायम ठेऊ, असे राऊत म्हणाले.
२०२४ मध्ये उद्धव ठाकरे पंतप्रधान पदाचा चेहरा असतील का? यावर संजय राऊत म्हणाले, यावर आता भाकित करण सोप नाही. राजकारणात काहीही घडू शकतं. उद्धव ठाकरे उत्तम चेहरा आहे. महाविकास आघाडी असताना सर्वांनी ठरवलं होत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होत असतील तर एकत्र येऊ आणि सरकार बनवू. त्यानंतर सरकार बनले.
आज जे महाराष्ट्रातील विरोधी पक्षांचे प्रमुख चेहरे आहेत. त्या उद्धव ठाकरे यांचा चेहरा महत्वाचा वाटतो. उद्धव ठाकरे हिंदुत्ववादी आहेत. पंतप्रधान कोण हे नंतर ठरवता येईल पण आधी एकत्र येऊन लढणे महत्वाचे आहे. एकत्र येण्यावर उद्धव ठाकरेंचा भर आहे, असे संजय राऊत म्हणाले.