दैनिक सामनाच्या मुख्य संपादकपदाची धुरा पुन्हा उद्धव ठाकरेंकडे|Uddhav Thackeray became new editor of shiv sena mouthpiece Saamana | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Uddhav Thackeray

दैनिक सामनाच्या मुख्य संपादकपदाची धुरा पुन्हा उद्धव ठाकरेंकडे

दैनिक सामनाच्या मुख्य संपादकपदाची धुरा पुन्हा उद्धव ठाकरे यांच्याकडे देण्यात आली आहे. अडीच वर्षापूर्वी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्नी रश्मी ठाकरे यांना संपादकपदाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यापूर्वी, खुद्ध उद्धव ठाकरे मुखपत्राचे संपादक होते, पण मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याआधी त्यांनी या पदाचा राजीनामा दिला होता. मात्र, आता त्यांनी पुन्हा ही जबाबदारी स्विकारली आहे.(Uddhav Thackeray became new editor of shiv sena mouthpiece Saamana)

90 च्या दशकात आपले विचार,राजकीय भूमिका महाराष्ट्रातील जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी 1988 मध्ये 'सामना' दैनिकाची सुरुवात केली होती. त्याच्या निधनानंतर उद्धव ठाकरे यांना पदाची जबाबदारी देण्यात आली.

त्यानंतर २०१९मध्ये उद्धव ठाकरे यांनी राज्यात राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत महाविकासआघाडीचे सरकार स्थापन करत २९ नोव्हेंबर २०१९ ला मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर ठाकरे यांनी सामना संपादकपदाची धुरा पत्नी रश्मी ठाकरे यांच्याकडे सोपवली. दरम्यान, राज्यात सत्तानाट्यानंतर कट्टर सेनेनेते एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड पुकारत भाजपसोबत जात नवे सरकार स्थापन केले.

सरकार अल्पमतात आल्याने उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. आता त्यांनी पुन्हा दैनिक सामनाच्या मुख्य संपादकपदाची धुरा हाती घेतली आहे.

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत सामनाचे कार्यकारी संपादक आहेत.अनेक वर्षांपासून 'सामना'मधून शिवसेना राजकीय भूमिका, विचार प्रखरपणे मांडायची. यामधील लिहिले गेलेले अनेक लेख चर्चेचा विषयही बनले आहेत.

Web Title: Uddhav Thackeray Became New Editor Of Shiv Sena Mouthpiece Saamana

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..