Raj Thackeray : "राजसाहेबांचं आजचं भाषण म्हणजे तुरटी आणि अणुबॉम्ब"; संदीप देशपांडेंचे सूतोवाच | MNS chief Raj Thackeray Gudi Padwa rally Sandeep Deshpande speech Maharashtra Politics | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Raj Thackeray Shivaji Park
Raj Thackeray : "राजसाहेबांचं भाषण म्हणजे तुरटी आणि अणुबॉम्ब"; संदीप देशपांडेंचे सूतोवाच

Raj Thackeray : "राजसाहेबांचं आजचं भाषण म्हणजे तुरटी आणि अणुबॉम्ब"; संदीप देशपांडेंचे सूतोवाच

Raj Thackeray Speech : मनसेचा गुढी पाडवा मेळावा आज मुंबईत पार पडत आहे. या मेळाव्यामध्ये राज ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. अशातच आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केलेल्या विधानामुळे मनसैनिकांचं कुतूहल चाळवलं आहे.

राज ठाकरे आज कोणते मुद्दे मांडणार, कोणत्या मुद्द्यांवर भाषण करणार, याकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागलेलं आहे. दरम्यान, आज गुढीपाडवा मेळाव्यामध्ये बोलताना संदीप देशपांडे यांनी एक सूचक विधान केलं आहे. राज ठाकरेंचं आजचं भाषण म्हणजे तुरटी आणि अणुबॉम्ब असणार, अशा आशयाचं विधान संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी केलं आहे.

आजच्या भाषणाबद्दल बोलताना संदीप देशपांडे म्हणाले, "दरवर्षी मनसेच्या गुढी पाडवा मेळाव्यात एक नवीन संदेश घेऊन राज ठाकरे समोर येतात. सध्या जे गलिच्छ आणि खालच्या दर्जाचं राजकारण सुरू आहे, त्यावर तुरटी फिरवण्याचं काम राज ठाकरेंचं आजचं भाषण करेल".

"राज ठाकरेंचा रेकॉर्ड फक्त तेच मोडू शकतात"

आजची सभा रेकॉर्ड ब्रेक होणार हे अप्रत्यक्षपणे सांगताना संदीप देशपांडे म्हणाले, "राज ठाकरेंचं भाषण अणुबॉम्ब असेल, त्याचे हादरे सगळ्यांनाच बसणार आहेत. राज ठाकरेंची सभा नेहमीच रेकॉर्डब्रेक असते. त्यांच्या आधीच्या सभांचे रेकॉर्ड फक्त तेच मोडू शकतात. बाकी कोणालाही ते शक्य नाही."