मुख्यमंत्री म्हणाले, PM मोदींची सभा IPL सारख बघत होतो; कारण... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Uddhav Thackeray

मुख्यमंत्री म्हणाले, PM मोदींची सभा IPL सारख बघत होतो; कारण...

मुंबई : मागे पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi) यांनी कोरोनावर सभा घेतली होती. मोदींची सभा मी आयपीएलसारख बघत होतो. कारण, मला काहीही बोलायचं नव्हत. त्यांनी आम्हाला काहीही दिलं नाही. उलट आम्हालाच पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्यास सांगितले. हे त्यांचे उपाय होते, असे म्हणत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला चढवला.

मुख्यमंत्र्यांची शनिवारी (ता. १४) रात्री मुंबईतील बीकेसी मैदानावर (BKC Ground) जाहीर सभा पार पडली. सभेला संबोधित करताना ते बोलत होते. महागाईवर कोणीच बोलत नाही. अनेक गोष्टींवर चर्चा करतात; मात्र, महागाईवर बोलण्याची यांची हिंमत होत नाही. कुठे गेले कोरोनावरील उपचार, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले.

हेही वाचा: पेटलेली मुंबई बाळासाहेबांनी शांत केली - एकनाथ शिंदे

कोरोनाचा बोंबाबोंब केला. यासाठी सभा घेतली. सभेसाठी प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आमंत्रित केले होते. मी पण सभेला उपस्थित होते. मात्र, काहीही बोललो नाही. कोरोनाची माहिती दिली आणि उपायाची वेळ आली तेव्हा महाराष्ट्राला पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्याचा सल्ला दिला. आम्ही तुम्हाला काहीही देणार नाही, असे सांगितले. नुसते स्वप्न दाखवण्याचे काम केले, असे म्हणत मोदींवर (narendra modi) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी हल्ला केला.

Web Title: Uddhav Thackeray Chief Minister Pm Modis Meeting Was Looking Like Ipl Inflation

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top