Thackeray vs Shinde : चिन्हांबाबत शिंदे गटाची आयोगाकडे याचिका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Uddhav Thackeray cm Eknath Shinde shiv sena party petition election commission politics mumbai

Thackeray vs Shinde : चिन्हांबाबत शिंदे गटाची आयोगाकडे याचिका

मुंबई : शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पक्षाच्या प्राथमिक सदस्यांचा तसेच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा नसतानाही अंधेरी (पूर्व) मतदारसंघातील आगामी पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावर आपल्या गटाच्या वतीने उमेदवारी दाखल करीत आहेत. त्यामुळे निवडणूक चिन्हांबाबत असलेला वाद निवडणूक आयोगाने तातडीने सुनावणीस घेऊन त्यावर निर्णय घ्यावा, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका याचिकेद्वारे निवडणूक आयोगाकडे केली आहे.

शिंदे यांनी याचिकेत उद्धव ठाकरे यांना प्रतिवादी केले आहे. त्यांच्याकडे पक्षाच्या प्राथमिक सदस्यांचा पाठिंबा नसल्यानेच निवडणूक आयोगाने पुरेशी कागदपत्रे सादर करण्याबाबत नोटीस काढूनही वारंवार मुदत वाढवून मागत आहेत. शिवसेनेच्या १९ पैकी १२ खासदार आणि ५५ पैकी ४० आमदारांचा आपल्याला पाठिंबा आहे. त्याचबरोबर ३६ लाख ५७ हजार ३२७ कार्यकारी सदस्य आणि ३१हजार २९१ प्राथमिक सदस्यांची शपथपत्र आयोगाकडे सादर केली आहेत.