"अजून काही जणांना खोके मिळाले नाहीत, त्यांना..." ; उद्धव ठाकरे शिंदे गटावर संतापले - Uddhav Thackeray | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Uddhav Thackeray

Uddhav Thackeray : "अजून काही जणांना खोके मिळाले नाहीत, त्यांना..." ; उद्धव ठाकरे शिंदे गटावर संतापले

ठाकरे गटाचे प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची रत्नागिरी येथील खेडमध्ये जाहीर सभा झाली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंपासून नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत सर्वांचा समाचार घेतला. तुमच्या आई वडिलांचे नाव लावा आणि मग पक्ष काढा. मग नाव लावा, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरे म्हणाले, "मी आता बाहेर पडलो आहे. होऊन जाऊ द्या, नाव, चिन्ह गोठवलं. तरीही आम्ही अंधेरीला जिंकलो. ज्यांचे राजकीय कर्तृत्व तुमच्या आमच्या आधारानं फुललं ते आता आम्हाला शिकवणार, गद्दार आम्हाला शिकवणार का, महाराष्ट्रतील तरुणांच्या नोकऱ्या हिरावल्या. हे बाळासाहेबांचे विचार नव्हते".


कर्नाटकच्या मुख्यमंत्र्याची हिंमत झाली नाही जेव्हा मी मुख्यमंत्री होतो. आता हे शेपूट घालून बसले आहेत. दिल्लीसमोर शेपट्या घालून बसणे हे बाळासाहेबांचे विचार नव्हते. केवळ हिंदूत्ववादी विचार म्हणून भाजपला डोक्यावर घेतले, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर दिली. 

"मी घरात बसून जो महाराष्ट्र सांभाळला तो तुम्हाला बाहेर पडून सांभाळता आला नाही. अजुन काही जणांना खोके मिळाले नाहीत त्यांना सांभाळण्यात तुमचा वेळ जातो आहे. देशाच्या पंतप्रधानांचे कौतूक झाले नाही ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे झाले. हे लक्षात येत नाही का तुमच्या", असे ठाकरे म्हणाले.