Maharashtra Politics : 'शिवसेना' हातातून गेल्यावर उद्धव ठाकरेंनी धरला फडणवीसांचा हात? पाहा व्हिडीओ | Uddhav Thackeray Devendra Fadnavis Together in assembly session maharashtra politics | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Devendra Fadnavis Uddhav Thackeray
Maharashtra Politics : 'शिवसेना' हातातून गेल्यावर उद्धव ठाकरेंनी धरला फडणवीसांचा हात? पाहा व्हिडीओ

Maharashtra Politics : 'शिवसेना' हातातून गेल्यावर उद्धव ठाकरेंनी धरला फडणवीसांचा हात? पाहा व्हिडीओ

Uddhav Thackeray Devendra Fadnavis : अधिवेशन आता संपत आलेलं असताना विधानभवनात आज वेगळंच चित्र पाहायला मिळालं. यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. एकेकाळचे मित्र पण आताचे कट्टर विरोधक एकत्रच विधानभवनात एकत्र येताना दिसले.

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा सध्या शेवटचा आठवडा सुरू आहे. या अधिवेशनामध्ये आज देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे एकत्रच येताना दिसले. त्यामुळे आता अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. सभागृहाचं कामकाज सुरू होत असताना या दोघांनी एकत्रच हसत हसत विधानभवनात प्रवेश केला. शिवसेनेतल्या बंडापासून आज पहिल्यांदाच हे दोघे एकत्र दिसले.

फडणवीस आणि ठाकरे हे दोघेही चालत येत असताना काहीतरी चर्चाही करताना दिसले. तोंडावर हात ठेवून उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीसांना काहीतरी सांगताना दिसत आहेत. हे दृश्य पाहून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

उद्धव ठाकरेंसोबत यवेळी ठाकरे गटाचे आमदार, अंबादास दानवे, आदित्य ठाकरे आदी होते. दोघांनीही हसतमुखाने एकमेकांशी बोलत विधानभवनात प्रवेश केला. आजपर्यंत या दोघांना केवळ एकमेकांवर टीका करताना पाहिलं आहे. त्यामुळे आता जुनी मैत्री पुन्हा आठवली का, किंवा शिवसेना हातातून गेल्यावर ठाकरेंनी पुन्हा फडणवीसांचा हात धरला का, अशा चर्चा होऊ लागल्या आहेत.