शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? लेखी युक्तीवादासाठीचा अखेरचा दिवस: Shiv Sena Thackeray vs Shinde | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Uddhav Thackeray Eknath Shinde Election Commission ShivSena dhanushyaban symbol

Shiv Sena Thackeray vs Shinde: शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? लेखी युक्तीवादासाठीचा अखेरचा दिवस

शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाच्या लढाईसंदर्भात आज महत्त्वाचा दिवस आहे. दोन्ही बाजूंचे प्रत्यक्ष युक्तिवाद संपल्यानंतर लेखी युक्तीवादासाठी आज शेवटचा दिवस आहे. गेल्या सुनावणी दरम्यान दोन्ही बाजूंनी पक्षाच्या घटनात्मक मुद्द्यांवर एकमेकांवर आरोप केले होते. त्यानंतर 30 तारखेपर्यंत आपलं म्हणणं मांडण्यासाठी आयोगानं मुदत दिली होती. (Uddhav Thackeray Eknath Shinde Election Commission ShivSena dhanushyaban symbol )

सुप्रीम कोर्टात सोळा आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय अद्याप झालेला नाही, त्यामुळे शिवसेना पक्ष कुणाचा आणि धनुष्यबाण चिन्ह कुणाला याबाबतचा निर्णय देतांना निवडणूक आयोगाची मोठी कसोटी लागणार आहे.

निवडणूक आयोगाच्या समोर शिंदे गट आणि ठाकरे गट यांनी केलेला युक्तिवाद बघता धनुष्यबाण चिन्ह कुणाला याबाबत स्पष्टता येत नाही. निवडणूक आयोगाकडून आत्तापर्यन्त तारीख पे तारीख सुरू आहे.

दोन्ही गटाकडून प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले आहे. लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी यांचे संख्याबळ बघता दोन्ही गटाने धनुष्यबाण चिन्ह आम्हालाच मिळेल असा दावा केला आहे.

आयोगात आत्तापर्यंत काय झालंय?

  • 10 जानेवारीला झालेल्या सुनावणीत ठाकरे गटाच्या वतीनं कपिल सिब्बल यांनी या संपूर्ण केसच्या कायदेशीर वैधतेबद्दल प्रश्न निर्माण केले

  • सुप्रीम कोर्टात केस सुरु असताना ही सुनावणी आयोगाला करता येते की नाही याबाबत आधी निकाल द्यावा अशी विनंती केली.

  • पण केसच्या वैधतेसह सर्व निकाल आम्ही एकत्रित देऊ असं आयोगानं म्हटलं

  • त्यानंतर शिंदे गटाच्या वतीनं वकील महेश जेठमलानी, मणिंदर सिंह यांनी युक्तिवाद पूर्ण केलेत

  • ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावर त्यांनी प्रश्न उपस्थित केले, सादिक अली केसनुसार निवडणूक आयोग हेच एकमेव अथॉरिटी आहे अशा वादावर निर्णयासाठी हे शिंदे गटानं सांगितलं

  • 30 जानेवारीला लेखी उत्तर सादर करण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश

टॅग्स :Shiv SenaEknath Shinde