MLC Election: पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांसाठी आज मतदान; जाणून घ्या सविस्तर माहिती

राज्यात सत्तांतरानंतर पहिल्यांदाच विधान परिषदेची निवडणुक
  Elecation
Elecationsakal

महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक आणि अमरावती या पदवीधर तसंच औरंगाबाद, नागपूर आणि कोकण या शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे.(Maharashtra MLC Election News Graduate Constituency And Teacher Election )

राज्यात सत्तांतरानंतर पहिल्यांदाच विधान परिषदेची निवडणुक होत आहे. महाविकास आघाडी आणि भाजप-शिंदे गट असा थेट सामना पुन्हा एकदा रंगणार आहे. नाशिक आणि नागपूर इथल्या मतदारसंघांमध्ये चुरस वाढली आहे. पहिल्या दिवसांपासून ते आतापर्यंत नाशिक मतदारसंघात नवनव्या घडामोडी पाहायला मिळत आहेत.

पदवीधर मतदार संघ

विधानपरिषदेच्या पाच जागांमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेली आणि सगळ्याचं लक्ष असलेली निवडणूक म्हणजे नाशिक पदवीधर मतदारसंघाची. काँग्रेसने उमेदवारी दिलेल्या सुधीर तांबे यांनी अर्ज मागे घेतला आणि त्याच वेळी त्यांचे पुत्र सत्यजीत तांबे यांनी अपक्ष म्हणून फॉर्म भरला.

  Elecation
कोण मारणार बाजी! नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी आज मतदान

पक्षविरोधी भूमिका घेतल्याने काँग्रेसने सुधीर तांबे आणि सत्यजीत तांबे यांना निलंबित करण्यात आले. तर महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाच्या शुभांगी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

नाशिक पदवीधर मतदारसंघ

शुभांगी पाटील (अपक्ष)

सत्यजीत तांबे (अपक्ष)

धनराज विसपुते (अपक्ष)

धनंजय जाधव (अपक्ष)

तर अमरावतीमध्येही पदवीधर निवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे. अमरावती विभाग पदवीधर निवडणुकीत महाविकास आघाडीकडून ही जागा काँग्रेस लढवत असून धिरज लिंगाडे हे रिंगणात आहेत. या पदवीधर मतदारसंघात भाजप, शिवसेना (बाळासाहेबांची शिवसेना) आणि रिपाइं (आठवले गट) युतीचे उमेदवार डॉ. रणजित पाटील रिंगणात आहेत. त्यामुळे ही लढत रंगतदार होणार आहे.

शिक्षक मतदारसंघ

नागपूर शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीच्या समर्थनाने शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे गंगाधर नाकाडे मैदानात उतरले आहेत. त्यांच्यासमोर भाजप प्रणित आणि महाराष्ट्र शिक्षक परिषदेचे उमेदवार नागो गाणार यांचं आव्हान आहे.

तर कोकण शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीकडून शेकाप उमेदवार बाळाराम पाटील यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. इथे भाजपकडून ज्ञानेश्वर म्हात्रे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे ही लढत चुरशीची होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

तसेच, औरंगाबात शिक्षक मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भाजप सामना पाहायला मिळेल. गेली कित्येक वर्षे औरंगाबाद शिक्षक मतदारसंघ राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. त्यामुळे यावेळी देखील हा मतदारसंघ आपल्याच ताब्यात ठेवण्यासाठी राष्ट्रवादीकडून प्रयत्न केले जात आहेत.

तर दुसरीकडे भाजपकडून देखील हा मतदारसंघ आपल्या ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. यासाठी काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या किरण पाटील यांना भाजपकडून रिंगणात उतरवण्यात आलं आहे. तर विक्रम काळे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com