

Summary
उद्धव ठाकरे यांनी परभणीतील मानवत येथे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला.
त्यांनी शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी नव्हे तर कर्जमुक्तीची मागणी केली.
पंतप्रधान मोदी निवडणुकीआधी पॅकेज देऊन शेतकऱ्यांच्या “तोंडाला पाने पुसतील” अशी टीका त्यांनी केली.
शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज परभणीमधील मानवतमध्ये अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला, ते म्हणाले की, फक्त कर्जमाफी नको कर्जमुक्ती हवी आहे. पंतप्रधान मोदी निवडणुकीच्या तोंडावर एखादं पॅकेज देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसतील, पण सरकारचा गळा दाबत नाही तोपर्यंत तुमच्याकडे कोणी लक्ष देणार नाही. शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्याऐवजी सरकारला जाब विचारला पाहिजे असं ठाकरे म्हणाले.