Loksabha Election : 'कल्याण' जिंकण्यासाठी ठाकरे गटाची मोठी खेळी; खासदार शिंदेंचं वाढणार टेन्शन, 'हा' बडा नेता होणार सक्रीय!

आगामी 2024 लोकसभा निवडणुकीसाठी सर्व पक्ष झाले सक्रीय
Kalyan LokSabha constituency
Kalyan LokSabha constituencyesakal
Summary

मुख्यमंत्री पद शिंदे यांच्याकडे आल्यानंतर त्यांचे खासदार पुत्र शिंदे यांच्या आक्रमक राजकारणामुळे ठाणे जिल्ह्यातील भाजपमध्ये कमालिची अस्वस्थता असून ती आजही कायम आहे.

डोंबिवली : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (Dr. Shrikant Shinde) यांच्या कल्याण लोकसभा (Kalyan LokSabha Election) मतदार संघाला वेगळेच राजकीय वजन प्राप्त झाले आहे. कल्याण लोकसभेवर भाजपचा आधीपासूनच डोळा आहे.

मानपाडा पोलिस (Manpada Police) ठाण्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याच्या बदलीवरुन भाजप आणि शिंदे गटातील राजकारण चांगलेच तापले होते. यातून सुटका होते ना होते तर उद्धव ठाकरेंनीही (Uddhav Thackeray) आता कल्याण ताब्यात घेण्यासाठी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. संपर्कप्रमुख सुभाष भोईर (Subhash Bhoir) यांच्याकडे या मतदार संघाची जबाबदारी असून विद्यमान खासदार यांच्या डोकेदुखीत यामुळे वाढ होणार असल्याचे बोलले जात आहे.

Kalyan LokSabha constituency
Loksabha Election News: राष्‍ट्रवादीचा राज्यातला पहिला उमेदवार ठरला! शरद पवार गटाच्या 'या' नेत्यानं केली मोठी घोषणा

शिंदे पिता-पुत्राकडून दुखावलेले भोईर यांना या मतदार संघात छुप्या पद्धतीने इतर पक्षाचा पाठिंबा मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे ठाकरे गटाला टक्कर देण्यासोबतच इतर पक्षीय पदाधिकाऱ्यांचा राग शांत करण्याचे मोठे आव्हान शिंदे यांच्यापुढे असेल. आगामी 2024 लोकसभा निवडणुकीसाठी सर्व पक्ष सक्रीय झाले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे ठाणे आणि त्यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांचा कल्याण लोकसभा मतदार संघाला वेगळेच वलय निर्माण झाले आहे. राज्यात भाजप व शिंदे गटाचे सरकार आले असले तरी भाजपने आत्तापर्यंत वाट्याला न आलेल्या राज्यातील 16 जागांवर लक्ष केंद्रीत करत त्या मतदार संघात केंद्रीय मंत्र्यांनी अनेक दौरे केले आहेत.

Kalyan LokSabha constituency
Gokul Milk Politics : हिंमत असेल तर सतेज पाटलांनी एका व्यासपीठावर समोरासमोर यावं; काँग्रेस आमदाराला कोणी दिलंय आव्हान?

कल्याण लोकसभा मतदार संघाचा देखील यात समावेश असून केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचा सातत्याने या प्रभागात दौरा असतो. ठाकूर यांच्या दौरा आणि आमदार संजय केळकर यांनी कल्याण लोकसभा मतदार संघ भाजपचा असा दावा करताच हा मतदार संघ भाजपकडे जाणार का? या चर्चांना उत आला. खासदार शिंदे हे वारंवार वरिष्ठांनी शिवसेनेचे मतदार संघ शिवसेनेकडेच राहणार असे स्पष्ट केले असल्याचे सांगत असले, तरी स्थानिक भाजपा नेते मात्र वारंवार त्यांच्या वक्तव्यांना आव्हान देत होते.

त्यातच मानपाडा पोलिस ठाण्यात भाजपचे पदाधिकारी नंदू जोशी यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आणि या चर्चेचे वादात रुपांतर झाले. भाजपने आंदोलन करत वरिष्ठ पोलिस निरिक्षकाची बदलीची मागणी केली, त्यांना मनसेने देखील पाठिंबा दिला. मात्र त्याकडे वरिष्ठ पातळीवर काही हालचाली होत नसल्याने भाजपचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली लोकसभा मतदार संघातील पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली.

Kalyan LokSabha constituency
Belgaum : ..अखेर महाराष्ट्र एकीकरण समितीनं जिंकली कोर्टाची लढाई; 'या' प्रकरणातून आठ कार्यकर्त्यांची निर्दोष सुटका

बैठकीत शिंदे गटास असहकाराचा ठराव करण्यात आला. या ठरावाची माहिती समजताच कुटंबासह फिरण्यास राज्याबाहेर गेलेले खासदार शिंदे हे चांगलेच विचलित झाले. तेथून त्यांनी आपली प्रतिक्रीया मांडत पदाचा राजीनामा देण्याची तयारी दाखविली. यानंतर वरिष्ठ पातळीवर सुत्र हालली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार शिंदे यांच्यात पार पडलेल्या बैठकीनंतर फडणवीस यांनी शिवसनेच्या जागांवर शिवसेनाच निवडणूक लढवेल असे सांगत या वादावर पडदा पाडला.

भाजपच्या असहकार्यातून सुटका होत नाही तोच आता शिंदे यांच्यापुढे ठाकरे गटाचे आव्हान उभे राहीले आहे. खासदार शिंदे यांनी शिवसेना शाखा संपर्क अभियानाच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांना वारंवार आव्हान दिल्याचे पहायला मिळाले आहे. ठाकरे यांनी देखील आता खासदार शिंदे यांना त्यांच्यात मतदारसंघात घेरण्यासाठी रणनिती आखली आहे. बोरीवली मागाठाणे आणि कल्याण लोकसभा मतदार संघातील संपर्क प्रमुखांची बैठक बोलावत ठाकरे यांनी सक्रीय होत कामाला लागण्याच्या सूचना केल्या आहेत.

Kalyan LokSabha constituency
Lok sabha Election 2024: ठरलं! महादेव जानकर CM योगींच्या राज्यातून लढवणार लोकसभा निवडणूक? 'या' मतदारसंघातूनही आजमावणार नशीब

कल्याण लोकसभा मतदार संघाचे संपर्क प्रमुख पद हे माजी आमदार सुभाष भोईर यांच्याकडे आहे. भोईर हे देखील खासदारकीसाठी इच्छुक असल्याचे आधीपासूनच बोलले जात असून त्यांच्या वाढदिवसी ठाकरे गटातील कार्यकर्त्यांनी भावी खासदार अशा शुभेच्छा भोईर यांना देऊ केल्या आहेत. विधानसभा निवडणुकीत शिंदे पिता पुत्राकडून भोईर हे दुखावले गेले होते. थेट मातोश्रीवरुन भोईर यांना तिकीट देण्यात आल्यानंतरही ठाण्यातून राजपुत्राच्या हट्टापायी सुत्र हलली आणि रमेश म्हात्रे यांना ऐन वेळी तिकीट देत उमेदवारी शिवसेनेतून देण्यात आली.

यानंतर भोईर हे नाराज होऊन ठाण्यातील शिवसेनेतून काहीसे बाजूलाच झाले होते. भाजपच्या वाटेवर ते असल्याचे बोलले जात होते, मात्र तेथे ही त्यांना वेटींग वर ठेवण्यात आल्याची चर्चा होती. राज्यात शिंदे गट वेगळा झाल्यानंतर भोईर यांच्या मार्गातील अडथळा दूर झाल्याने आता भोईर पक्षात सक्रीय होतील असे बोलले जात असून त्यांनी रणनिती आखण्यास सुरुवात देखील केली आहे. भोईर यांचे आव्हान शिंदे यांना डोकेदुखी ठरणार असल्याचे बोलले जात आहे.

मुख्यमंत्री पद शिंदे यांच्याकडे आल्यानंतर त्यांचे खासदार पुत्र शिंदे यांच्या आक्रमक राजकारणामुळे ठाणे जिल्ह्यातील भाजपमध्ये कमालिची अस्वस्थता असून ती आजही कायम आहे. भाजप सोबतच मनसे, राष्ट्रवादी, कॉंग्रेस पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते यांनाही खासदार शिंदे यांच्या आक्रमक पणाचा फटका वारंवार बसत आला आहे. मुख्यमंत्री शिंदे यांचे ते पुत्र असल्याने इतर पक्षातील पदाधिकारी नमते घेत असले तरी आगामी निवडणुकीत सूत्र हालण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Kalyan LokSabha constituency
Sangli : बेडगमध्ये JCB नं पाडली आंबेडकरांच्या नावाची कमान; दोन ग्रामसेवकांचं निलंबन, 'सीईओं'ची मोठी कारवाई

माजी आमदार सुभाष भोईर यांचे मनसेचे आमदार राजू पाटील, भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांच्याशी सलोख्याचे संबंध आधीपासून राहीले आहे. कल्याण ग्रामीण भाग, दिवा, अंबरनाथ येथे भोईर यांच्या शब्दाला वजन असून त्यांना मानणारा एक वेगळा गट आहे. तसेच आगरी कार्ड हा पॅटर्न चालल्यास त्याचा फायदा भोईर यांना मिळू शकतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com