मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत युतीबाबत सकारात्मक असतानाही राज ठाकरे यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी, वेळ आल्यास सर्व जागांवर निवडणुका लढवण्यासाठी तयार राहण्याची सूचना जिल्हाप्रमुख-संपर्कप्रमुखांच्या बैठकीत दिल्या. तसेच विधानसभा निवडणुकीत ४० लाख मतदार अचानक कसे वाढले? याची तपासणी घराघरात जाऊन करा, असे आदेशही त्यांनी गटप्रमुखांना दिले.