Vedanta & Foxconn प्रकल्प गुजरातेत; महाराष्ट्राला काय होणार तोटा?

Vedanta & Foxconn
Vedanta & FoxconnSakal

मुंबई : महाराष्ट्रात होणारा वेदांता आणि फोक्सकॉन सेमीकंडक्टर प्रकल्प गुजरातेत हलवण्यावरून सध्या राज्यात राजकारण पेटलं आहे. राज्यात भाजपचे सरकार असल्यामुळे राज्यात होणारे प्रकल्प गुजरातेत हलवले जात असल्याचा आरोप शिवसेना आणि विरोधी पक्षांकडून केला जात आहे. तर महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना हा प्रकल्प महाराष्ट्रात व्हावा यासाठी आम्ही पाठपुरावा केला आणि दोन महिन्यांत आलेल्या सरकारने एवढं काय केलं की ही कंपनी गुजरातेत गेली? अशा सवाल शिवसेनेच्या आदित्य ठाकरे यांच्याकडून करण्यात आला आहे. दरम्यान, हा प्रकल्प गुजरातेत गेल्यामुळे महाराष्ट्राला मोठा फटका बसणार आहे.

(Vedanta And Foxconn shifted to Gujrat Latest Updates)

महाराष्ट्राला काय होणार तोटा?

वेदांता आणि फोक्सकॉन सेमीकंडक्टर प्रकल्पातून गुजरातला मोठा फायदा होणार असून महाराष्ट्राला मोठा फटका बसणार आहे. दरम्यान या प्रकल्पामध्ये १.५४ लाख कोटी रूपयांचा गुंतवणूक केली जाणार होती. त्याचबरोबर या प्रकल्पामुळे राज्यात जवळपास १ लाख नोकऱ्यांची निर्मिती झाली असती पण हा प्रकल्प हलवल्यामुळे महाराष्ट्र या फायद्याला मुकणार आहे.

पश्चिम महाराष्ट्रात हा प्रकल्प सुरू होणार होता. त्यामध्ये जवळपास ३० टक्के थेट तर ७० टक्के अप्रत्यक्षरित्या रोजगार निर्मिती होणार होती. फोक्सकॉन कंपनी ही मुळची तैवानची असल्यामुळे वेदांता या कंपनीने तिच्यासोबत भागीदारी केली असून महाराष्ट्रात तीन टप्प्यामध्ये प्रकल्प उभारण्याचे प्रस्ताव मांडण्यात आले होते. त्यामध्ये पावणेदोन लाख रूपयांची गुंतवणूक करण्यात येणार होती. या माध्यमातून डिस्प्ले फॅब्रिकेशन, सेमीकंडक्टर, सेमीकंडक्टर असेम्ब्लीचे उत्पादन केले जाणार होते. त्याचबरोबर या माध्यमातून राज्य सरकारला मोठ्या प्रमाणावर कर मिळाला असता.

Vedanta & Foxconn
Lampi Disease : राज्यभरात 2664 जनावरांना लम्पीची लागण; आयुक्तांच्या महत्त्वाच्या सूचना

काय आहे हा प्रकल्प ?

प्रत्येक इलेक्ट्रॉनिक वस्तूला सेमीकंडक्टर (चीप) ची गरज असते. या चीपनिर्मितीत जगात तैवान आघाडीवर आहे. भारतात चीप निर्मितीचा एकही प्रकल्प नाही. त्यासाठी भारतात काम सुरू होते. या प्रकल्पासाठी वेदांत आणि फोक्सकॉन लिमिटेडकडून हालचाली सुरू झाल्यानंतर महाराष्ट्र, तेलंगणा आणि कर्नाटक ही राज्ये हा प्रकल्प आपल्याकडे खेचण्यासाठी स्पर्धेत होती. पण अचानक हा प्रकल्प गुजरातमध्ये हलवणार असल्याची घोषणा केली आहे.

दरम्यान, सेमीकंडक्टर प्रकल्पाबाबत आत्मनिर्भर होण्यासाठी भारतातील उद्योजकांकडून प्रयत्न सुरू होते. मागील काही वर्षांपासून सेमीकंडक्टरच्या तुटवड्यामुळे भारतातील उद्योगांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले. याचा ऑटो आणि स्मार्टफोन निर्मिती उद्योगांना मोठा फटका बसला होता. सोमवारी वेदांता समूहाने फॉक्सकॉन कंपनीसोबत 20 अब्ज डॉलरचा सेमीकंडक्टर प्रकल्प अहमदाबादजवळ उभारण्यात येणार असल्याची घोषणा केली.

Vedanta & Foxconn
Love Jihad: मुस्लीम तरूणीशी लग्न केलेल्या श्रीरामपुरातील 'त्या' तरूणाचा खून

दरम्यान, हा प्रकल्प गुजरातेत कसा गेला यावर अभ्यास सुरू आहे. त्यामुळे विरोधकांनी या गोष्टीवर राजकारण करू नये असं मत शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केलं आहे. त्याचबरोबर हा प्रकल्प गुजरातेत कसा गेला याचं उत्तर राज्य सरकारला द्यावे लागेल असा इशाराही विरोधकांनी दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com