Uddhav Thackeray : '...याला बापसुद्धा दुसऱ्याचा लागतो' उद्धव ठाकरेंकडून टोकाची टीका

Uddhav Thackeray News
Uddhav Thackeray Newsesakal
Updated on

छत्रपती संभाजीनगरः महाविकास आघाडीच्या वतीने आयोजित वज्रमूठ सभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता टोकाची टीका त्यांच्यावर केली आहे. आजही त्यांनी पुन्हा बाप चोरण्याचा मुद्दा उपस्थित केला.

यावेळी बोलतांना उद्धव ठाकरे म्हणाले की, सध्या सावरकर गौरव यात्रा काढण्यात आली आहे. अवश्य काढा. अनेक ठिकाणी हिंदू जनआक्रोश यात्रा काढण्यात येतोय. मुंबईतही हा मोर्चा निघाला. शिवसेना भवनासमोर हा मोर्चा आला होता. सध्या देशाचे पंतप्रधान हिंदू आहेत. तरी तुम्हाला हिंदू जनआक्रोश मोर्चा का काढावा लागतो, असा प्रश्नही ठाकरे यांनी उपस्थित केला.

कोरोना काळात उद्धव ठाकरे घराबाहेर पडले नाहीत, या मुद्द्यावरुन नेहमी टीका होते. त्यावर बोलतांना उद्धव ठाकरे म्हणाले की, हो पडलोच नाही ना मी घराबाहेर.. पण जे काम मी घरात बसून केलं ते तुम्ही वणवण फिरुन सुरत, गुवाहाटीला जावूनही करु शकत नाहीत.

Uddhav Thackeray News
Ajit Pawar : सावरकरांच्या मुद्द्यावरुन अजित पवारांचं भाजपला थेट आव्हान; म्हणाले...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता त्यांनी जोरदार टीकास्र सोडलं. ठाकरे म्हणाले की, आज देशामध्ये भाजपसोबत कुणीही नाही. ज्यावेळी गरज होती त्यावेळी त्यांनी आपल्याला वापरुन घेतलं. त्यांना आज खाली खेचाययं आहे.

काहींनी आज माझा पक्ष चोरला आहे. माझे वडील चोरायचा प्रयत्न करीत आहेत. अरे स्वतःच्या वडिलांना काय वाटत असेल, किती यातना होत असतील... काय सालं दिवटं, याला बापसुद्धा दुसऱ्याचा लागतो... मी माझ्या वडिलांचं नाव सोडणार नाही. पुन्हा एकदा सांगतो, हिंमत असेल तर तुम्ही मोदींना घेऊन महाराष्ट्रात या, मी माझ्या वडिलांचं नाव घेऊन राज्यात फिरतो. होवून जावू द्या. उद्धव ठाकरेला एकटा पाडण्याचा प्रयत्न सुरुय. पण आज माझ्यासोबत महविकास आघाडीची वज्रमूठ आहे.

नरेंद्र मोदी यांच्यावरही उद्धव ठाकरेंनी टीका केली, ते म्हणाले, मोठ्या ताकदीचा नेते केंद्रात आहे, तरी देखील हिंदू आक्रोश मोर्चा काढायची गरज का पडते? जर आम्ही काँग्रेससोबत जावून हिंदूत्व सोडलं असेल, तर तुम्ही महेबूबा मुफ्ती यांच्या सोबत जावून काय सोडलं? असा सवालच त्यांनी भाजपला केला.

मोदींना पदवी मागितली तर २५ हजार रूपये दंड बसतो. तर अमित शाह यांच्यावर बोलताना म्हणाले, आम्ही सत्तेसाठी काँग्रेस,राष्ट्रवादीचे तळवे चाटले, तर तुम्ही मिंदे गटाचे काय चाटत आहात? लालू-नितीश यांचं सरकार पाडून तुम्ही नितीश यांचं काय चाटलं, अशीही जहरी टीका त्यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com