Uddhav Thackeray : "मी राजीनाम्याच्या निर्णयावर समाधानी, जीवदान मिळालं ते तात्पुरतं…"

Eknath Shinde vs Uddhav Thackeray Supreme Court Hearing
Eknath Shinde vs Uddhav Thackeray Supreme Court HearingSakal Digital

राज्याच्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने काल निकाल दिल्यानंतर या निकालावर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यामुळे एकनाथ शिंदे सरकार वाचलं या चर्चेवर उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा प्रतिक्रिया दिली आहे. मी माझ्या त्या निर्णयावर समाधानी आहे असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

उद्धव ठाकरे म्हणाले की, "सगळ्या निकालपत्रात सर्वोच्च न्यायालयाने एक निरीक्षण नोंदवलं आहे, उद्धव ठाकरे यांनी जर राजीनामा दिला नसता तर त्यांना पुन्हा मुख्यमंत्री करता आलं असतं, पण त्यांनी राजीनामा दिल्याने त्यांना पुन्हा मुख्यमंत्री करता येत नाही. याचाच अर्थ असा होतो की, आत्ताचं अस्तित्वात असलेलं सरकार हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे. जर मी राजीनामा दिला नसता तर मला त्यांनी पुन्हा मुख्यमंत्री केलं असतं. म्हणजे हे सरकार बेकायदेशीर आहे. मी माझ्या निर्णयावर समाधानी आहे'', असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

Eknath Shinde vs Uddhav Thackeray Supreme Court Hearing
Jitendra Awhad : "अन् कुरूलकरने एका बाईसाठी देश विकायला…"; आव्हाडांनी केरळ स्टोरीवरुन साधला निशाणा

पुढे बोलताना ठाकरे म्हणाले की, "जीवदान मिळालं असेल तर ते तात्पुरतं आहे. एक रिझनेबल टाइमलादेखील मर्यादा आहेत. जसं मी माझ्या नैतिकतेला जागून राजीनामा दिला तसं या बेकायदेशीर सरकारने राजीनामा दिला पाहीजे. मी राजीनामा दिला नसता तर मुख्यमंत्री झालो असतो. एवढे धिंडवडे निघाल्यानंतर आपण निवडणूकीला सामोरे जाऊया. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल त्यांनी दिला आहे. पण लोकशाहीत सगळ्यात शेवटचं न्यायालय जनतेचं असतं, त्यामध्ये जायला काय हरकत आहे. हा फैसला जनतेवर सोपवूया आणि जनतेचा कौल स्विकारूया असे उद्धव ठाकरे म्हणाले."

Eknath Shinde vs Uddhav Thackeray Supreme Court Hearing
Shiv Sena Case : सत्तासंघर्षाच्या निकालाने गोंधळ उडालाय? माजी मुख्यमंत्र्यांनी सोप्या शब्दात सांगितला अर्थ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com