आज काॅग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांची यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मधे बैठक होती. यावेळी राष्ट्रवादी व काॅग्रेसचे दिग्गज नेते उपस्थित होते. अशा ऐनवेळी उध्दव ठाकरे यांचा शरद पवार यांना फोन आल्यानंतर त्याच फोनवरून काॅग्रेसचे अहमद पटेल देखील त्यांच्याशी संवाद साधतात हे पाहून बैठकीतले सर्वच नेते आनंदी भावनेने पाहत असतात..!
मुंबई : ‘हॅलो, साहेब मी उध्दव बोलतोय,’.. शरद पवार यांना काॅग्रेस नेत्यांसोबत बैठक सुरू असतानाच थेट उध्दव ठाकरेंचा फोन येतो.. पवार यांच्या बाजूलाच काॅग्रेसचे नेते अहमद पटेल व इतर दिग्गज नेते बसलेले असतात.. पवार फोनवर थोडं बोलून तो थेट अहमद पटेल यांच्याकडे देतात...
'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा
‘उध्दवजी नमस्ते, मै पटेल बोल रहां हू.. दिल्लीसे हम सोनियाजींका मेसेज लेकर आये है. हम साथ मे जायेंगे यह तय हुआ है.. अब जल्द ही हम काॅमन मिनिमम प्रोग्राम तय करेंगे... चिंता की कोई बात नही. एकबार तय हुआ तो अंतिम है...!
इतर काही थोडं बोलनं होते अन फोन ठेवला जातो.
आज काॅग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांची यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मधे बैठक होती. यावेळी राष्ट्रवादी व काॅग्रेसचे दिग्गज नेते उपस्थित होते. अशा ऐनवेळी उध्दव ठाकरे यांचा शरद पवार यांना फोन आल्यानंतर त्याच फोनवरून काॅग्रेसचे अहमद पटेल देखील त्यांच्याशी संवाद साधतात हे पाहून बैठकीतले सर्वच नेते आनंदी भावनेने पाहत असतात..!
असा असेल महाशिवआघाडीचा पुढील कार्यक्रम !
शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करण्याच्या निर्णयाचे हे स्पष्ट संकेत असल्याची भावना पक्की होवून पुढची चर्चा सुरू होते..!