
Uddhav Thackeray: खेडमध्ये पोहचताच उद्धव ठाकरेंची नारळाने काढली दृष्ट
रामदास कदमांच्या बालेकिल्ल्यात आज उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार आहे. उद्धव ठाकरे यांची आज रत्नागिरीत सभा होणार आहे. त्यासाठी ते खेडमध्ये दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी रश्मी ठाकरे याही खेडमध्ये दाखल झाल्या आहेत. खेडमध्ये पोहचताच त्यांची नारळाने दृष्ट काढण्याता आली. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Uddhav Thackeray Rashmi Thackeray Ratnagiri rituals Ravindra Waikar )
खेडमध्ये उद्धव ठाकरे रविंद्र वायकर यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. आज संध्याकाळी गोळीबार मैदानात पाच वाजता ही सभा होणार आहे. दरम्यान वायकर यांच्या घरी पोहचताच नारळाने दृष्ट काढण्यात आली. उद्धव ठाकरे यांच्यासह रश्मी ठाकरे यांचीही नारळाने दृष्ट काढली. त्यानंतर त्यांचं औक्षण करण्यात आलं.

खेडमधील गोळीबार मैदानात सायंकाळी पाच वाजता ही सभा होणार आहे. या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संजय कदम यांचा जाहीर पक्षप्रवेशही होणार आहे. माजी मंत्री रामदास कदम यांचे निकटवर्तीय माजी बांधकाम सभापती विश्वासकाका कदम हे देखील पक्षात प्रवेश करणार आहेत.