Uddhav Thackeray praises CM Devendra Fadnavis: कधीकाळी 'एक तर मी राहीन, नाहीतर तू राहशील',अशी टोकाची भाषा करणाऱ्या उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दलचा दृष्टीकोन आता मवाळ होऊ लागला की काय अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. गेल्या तीन वर्षांत एकमेकांवर आरोप प्रत्यारोप आणि टीका टिप्पणी केल्यांतर आता शिवसेनेच्या ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या 'सामाना'तून देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करण्यात आलं आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात विविध चर्चांनाही उधाण आलं आहे