ShivSena: 'भगवा' झेंडा फक्त हातात नको हृदयात हवा- उद्धव ठाकरे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shiv Sena

ShivSena: 'भगवा' झेंडा फक्त हातात नको हृदयात हवा- उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी भाजप आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गटाची खिल्ली उडवली. सत्तेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी हातमिळवणी करून ठाकरे यांनी हिंदुत्वाशी तडजोड केल्याचा आरोप भाजप आणि शिंदे गटाने अनेकदा शिवसेनेवर केला आहे.

त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की "भगवा झेंडा कोणाच्या हातात नसून ह्रदयात असावा" असे ठाकरे म्हणाले. मातोश्रीवर कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ठाकरे म्हणाले, देशात लोकशाही वाचवण्याची आणि हिंदुत्व टिकवण्याची ही ईश्वराने आपल्याला दिलेली संधी आहे. भगवा ध्वज कुणाच्या हातात नसावा, तो हृदयात असावा.

हेही वाचा: Chandrashekhar Bawankule: तो काळ आता गेला...; सुप्रिया सुळेंच्या ‘त्या’ विधानावर बावनकुळेंचा टोला!

ते माझ्या हृदयात आहे. 5 ऑक्टोबर रोजी शिवाजी पार्क येथे होणाऱ्या दसरा मेळाव्याला ठाकरे यांनी शिस्तबद्ध पद्धतीने जाण्यास सांगितले. सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोगात सुरू असलेल्या प्रकरणावर म्हणाले "आम्ही न्यायालयीन आणि निवडणूक आयोगासमोर चालू असलेली लढाई जिंकूच."