Chandrashekhar Bawankule: तो काळ आता गेला...; सुप्रिया सुळेंच्या ‘त्या’ विधानावर बावनकुळेंचा टोला!

शरद पवार विरोधात गेले की दौऱ्यावर निघतात
Chandrashekhar Bawankule: तो काळ आता गेला...; सुप्रिया सुळेंच्या ‘त्या’ विधानावर बावनकुळेंचा टोला!

राज्यात भाजपाकडून आगामी निवडणुकांच्या दृष्टिकोनातून पक्षबांधणीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. आगामी निवडणुकांच्या दृष्टिकोनातून काही दिवसांपूर्वी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे बारामती दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्यात त्यांनी केलेली विधानंही बरीच चर्चेत राहिली होती. या दरम्यान सुप्रिया सुळेंनी काल (बुधवारी) एका कार्यक्रमात बोलताना केलेल्या विधानावरून राज्याच्या राजकारणात चर्चा सुरू होताच बावनकुळेंनी त्यावरून सुप्रिया सुळेंना टोला लगावला आहे.

कार्यक्रमात बोलताना काय म्हणाल्या होत्या सुप्रिया सुळे?

इंदापूरमध्ये आयोजित कार्यक्रमात सुप्रिया सुळें यांनी म्हंटलं होत की, “शरद पवार विरोधात गेले की दौऱ्यावर निघतात. पण त्या दौऱ्यामध्ये काय गंमत होते माहिती नाही. काही दिवस एक महाराष्ट्राचा दौरा झाला की ते पुन्हा सत्तेत येऊन बसतात”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या. शरद पवारांच्या सोलापूर दौऱ्याचाही सुप्रिया सुळेंनी यावेळी उल्लेख केला होता.

Chandrashekhar Bawankule: तो काळ आता गेला...; सुप्रिया सुळेंच्या ‘त्या’ विधानावर बावनकुळेंचा टोला!
Sharad Pawar : एक दौरा अन् सत्तेत पुन्हा...; सुप्रिया सुळेंच्या विधानानं भुवया उंचावल्या

सुप्रिया सुळेंच्या यांच्या या विधानावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी पलटवार केला आहे. बावनकुळे म्हणाले की, तो काळ आता गेला आहे. शरद पवार याचं नाव आणि काम वापरून तुम्ही किती दिवस मोठे व्हाल? स्वत:चं कर्तृत्वही दाखवावं लागेल. शरद पवारांनी त्यांच्या आयुष्यात काम केलं आहे. पण त्यांच्या कामावर दुसरे तरून जातील असा काळ आता गेला आहे. जो पदावर आहे, तो किती काम करतो हे आता पाहिलं जातं. आता जनता तर बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर अशा विचाराची आहे”, असंही बावनकुळे म्हणाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com