Kalaram Mandir: उद्धव ठाकरे 22 जानेवारीला अयोध्येला नव्हे तर 'या' रामाच्या मंदिला देणार भेट

अयोध्येत होणाऱ्या राम मंदिराच्या उद्घाटनाला उद्धव ठाकरेंना निमंत्रण देण्यात आलेलं नाही.
Uddhav Thackeray_Kalaram Mandir
Uddhav Thackeray_Kalaram Mandir

मुंबई : अयोध्येत होणाऱ्या राम मंदिराच्या उद्घाटनाला उद्धव ठाकरेंना निमंत्रण देण्यात आलेलं नाही. पण अयोध्येतील रामल्लाच्या प्रतिष्ठापणेच्या दिवसी उद्धव ठाकरे नाशिकमधील काळाराम मंदिराला भेट देणार आहेत. (Uddhav Thackeray says we will visit Nashik Kalaram temple at 22 January 2024)

उद्धव ठाकरे यांनी स्वतः याबाबत माहिती दिली. त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितलं की, बाळासाहेब ठाकरेंची जयंती २३ जानेवारी रोजी असते. पण एक दिवस आधी २२ जानेवारी रोजी अयोध्येत उभारण्यात आलेल्या राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापणा केली जाणार आहे. (Marathi Tajya Batmya)

Uddhav Thackeray_Kalaram Mandir
Yavatmal Human Trafficking: दारुड्या बापानं पोटच्या तीन वर्षाच्या मुलाला विकलं; 14 तासांतच पोलिसांनी केली सुटका

पण याच दिवशी आम्ही नाशिक येथील काळाराम मंदिराला भेट देणार आहोत. या ठिकाणी गोदावरी नदीवर आम्ही महाआरती करणार आहोत, अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली. (Latest Marathi News)

Uddhav Thackeray_Kalaram Mandir
DGCA: अमेरिकेत विमानाचा हवेतच उघडला दरवाजा; भारतात DGCA अ‍ॅलर्टवर, काढले महत्वाचे आदेश

दरम्यान, काळाराम मंदिर हे ऐतिहासिक ठिकाण असून या मंदिर परिसरात २ मार्च १९३० रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्यांना मंदिर प्रवेशासाठी प्रतिकात्मक आंदोलन पुकारलं होतं. त्यामुळं इतिहासात ही घटना महत्वाची मानली जाते. बाबासाहेबांनी केलेल्या या कृतीला 'काळाराम मंदिर सत्याग्रह' असं संबोधलं जातं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com