
महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. यानंतर मंत्रिमंडळाची पहिली बैठकही पार पडली. तर आता महायुती सरकारच्या पहिल्याच दिवशी उद्धव ठाकरेंच्या शिलेदाराने मुख्यमंत्री फडणवीस यांना सोयाबीनवरून घेरलं आहे. सोयाबीनबाबत मुख्यमंत्री फडणवीस खोटं बोलत आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे.