Uddhav Thackeray: भाजपचे सरकार येऊ देणार नाही, निकालानंतर उद्धव ठाकरे यांची डरकाळी

INDIA vs NDA: भाजप गेल्या काही वर्षांत मित्र पक्षांबरोबर जशी वागत आहे ते पाहता सत्ता स्थापन करताना त्यांच्यासमोर मोठी आव्हाने असणार आहेत.
Uddhav Thackeray|MVA|INDIA
Uddhav Thackeray|MVA|INDIAEsakal

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी आज मतमोजणी पार पडली. यामध्ये महाराष्ट्रात भाजपचा धुव्वा उडाला आहे. यात महाविकास आघाडीच्या काँग्रेस, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी जवळपास 30 जागांवर विजय मिळवला आहे.

यानंतर उद्धव ठाकरे यांनी डरकाळी फोडत भाजपला आता सत्तेत येऊ देणार नसल्याचे म्हटले आहे. ते पुढे म्हणाले की, एनडीए मध्ये असेलेले अनेक पक्षही भाजपला कंटाळलेले आहेत. तेही आमच्याबरोबर येतील आणि यासह अनेक अपक्ष खासदार आमच्यासोबत येणार आहे. त्यामुळे सत्तेच्या उंबरठ्यावर गेलेल्या भाजपला आम्ही खाली खेचल्याशिवाय राहणार नाही.

आजच्या मतमोजणीमध्ये एनडीएला काठावरचे बहुमत मिळाले आहे. त्यामळे एनडीएतील चंद्राबाबू नायूडू आणि बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांचे देशाच्या राजकारणातील महत्त्व वाढले आहे. चंद्राबाबू आणि नीतीश यांनी प्रत्येकी जवळपास 20 जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे पुढते सरकार कोणाचे येणार याच्या चाव्या त्यांच्या हातात आहे.

या मुद्द्यावर बोलताना ठाकरे म्हणाले की, भाजपने चंद्राबाबू आणि नीतीश कुमारांना प्रचंड त्रास दिला आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा असा त्रास नको असला तर ते हे उंबरठ्यावरील सरकार येऊ देणार नाहीत.

Uddhav Thackeray|MVA|INDIA
Maharashtra Lok Sabha Election Winners Full List : महाराष्ट्राने भाकरी फिरवली! मविआचा महायुतीवर मोठा विजय; जाणून घ्या विजेत्यांची संपूर्ण यादी एका क्लिकवर

दरम्यान महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसने एकत्रित निवडणूक लढवली होती. यामध्ये या तिन्ही पक्षांनी दमदार कामगिरी करत भाजप आणि त्यांच्या सहयोगी पक्षांचा धुव्वा उडवला आहे.

यामध्ये अनपेक्षितपणे काँग्रेस 13 जागा जिंकत राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या पक्षाने आतापर्यंत 7 जागा जिंकल्या आहेत.

Uddhav Thackeray|MVA|INDIA
Beed: बीडमध्ये कायदा सुव्यवस्थेची स्थिती; पोलीस महासंचालकांनी लक्ष ठेवण्याचा शरद पवारांचं आवाहन

दुसरीकडे देशातही इंडिया आघाडीने दमदार कामगिरी केली असून भाजप आणि एनडीएला 300 जागांच्या खाली रोखले आहे.

एनडीए आतापर्यंत 294 जागांवर आघाडीवर आहे. तर, इंडिया आघाडी 235 जागांवर आघाडीवर आहे.

सध्याची परिस्थिती पाहता एनडीएला सरकार स्थापन करण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. भाजप गेल्या काही वर्षांत मित्र पक्षांबरोबर जशी वागत आहे ते पाहता सत्ता स्थापन करताना त्यांच्यासमोर मोठी आव्हाने असणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com