Shivsena Battle: तुम्हाला काय वाटतं, कोणतं नाव अन् चिन्ह उद्धव ठाकरेंसाठी योग्य?

जे व्हायला नको तेच झालं आणि शिवसैनिकांच्या काळजात धस्स झालं.
Shivsena Battle
Shivsena Battle esakal

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde: महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळं वळण देणारी घटना आता समोर आली आहे. ती म्हणजे ज्या पक्षानं गेल्या पाच दशकांहून अधिक काळ महाराष्ट्रातील जनतेच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं. प्रांतीय, भाषिक अस्मिता तयार केली त्या शिवसेना पक्षाला मोठा धक्का बसला आहे. या पक्षाचे नाव आणि चिन्ह हे दोन्ही संकटात आले आहे. यापुढील काळात ते नाव आणि चिन्ह निवडणूकीमध्ये वापरता येणार नाही. असे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे येत्या काळात काय होणार याकडे असा सवाल शिवसैनिकांकडून विचारला जातोय.

जे व्हायला नको तेच झालं आणि शिवसैनिकांच्या काळजात धस्स झालं. जे नावं आणि चिन्ह घेऊन घराघरात आणि मनामनात शिवसेना जाऊन पोहचली त्यावरच आयोगानं घाला घातल्यानं अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. कालपासून राज्याच्या राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या प्रकारची खलबतं घडताना दिसत आहे. सोशल मीडियावर तर अनेकांनी आपल्या तीव्र शब्दांत भावना व्यक्त केल्या आहेत. शिवसैनिकांकडून शिंदे गटावर मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली जातेय. यासगळ्यात आता शिवसेना पक्षप्रमुख कोणते पाऊल उचलले जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कार्यकर्ते, शिवसैनिक आणि पक्षनेते यांच्याकडून उद्धव ठाकरे पक्षाचे नाव आणि चिन्ह याबाबत कोणती भूमिका घेणार याविषयी कुतूहल आहे. सोशल मीडियावर अनेकांनी उद्वव ठाकरेंनी कोणतं चिन्हं घ्यावं, पक्षाला कोणते नाव द्यावे याविषयी प्रतिक्रिया दिली आहे. नुकत्याच हाती आलेल्या एका माहितीनुसार, त्रिशुळ, मशाल आणि उगवता सुर्य अशा चिन्हांचा वापर पक्ष करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

Shivsena Battle
Narayan Rane: नारायण राणेंचा संयम सुटला! 'उद्धव म्हणजे...'

दुसरीकडे पक्षाचे नाव आणि चिन्ह याबाबतचा वाद पुन्हा एकदा कोर्टात जाऊ शकतो असे सांगण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयानं पक्षाचे नाव आणि चिन्ह याबाबतचा निर्णय घेण्यास निवडणूक आयोगाला मुभा आहे. असे सांगण्यात आले होते. त्यामुळे शिवसेनेनं जरी पुन्हा कोर्टात धाव घेतली तरी त्यांचा मुद्दा न्यायालय विचारात घेणार का, तो मुद्दा वैध ठरेल का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. तुर्तास आता सेनेला पक्षासाठी सर्वोपरी मान्य असे नाव आणि चिन्ह शोधावे लागणार आहे.

Shivsena Battle
Rupali Patil: 'पेरणार तेच उगवणार', रुपाली पाटलांचे सुचक ट्विट

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com