Uddhav Thackeray : शिवसैनिकांना 'संजीवनी' देणारे उद्धव ठाकरेंच्या भाषणातील पाच मुद्दे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Uddhav Thackeray

Uddhav Thackeray : शिवसैनिकांना 'संजीवनी' देणारे उद्धव ठाकरेंच्या भाषणातील पाच मुद्दे

मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईतील पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर प्रथमच जाहीर सभेतून संबोधीत केले. यावेळी त्यांनी मुंबईसह शिवसैनिकांना नवसंजीवनी देणारे भाषण करत मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना पक्ष सज्ज असल्याचं बोलून दाखवलं. उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणातून भाजप आणि बंडखोर एकनाथ शिंदे गटावर जोरदार टीका केली. (Shivsene Melava news in Marathi)

हेही वाचा: Uddhav Thackeray: तुम्हाला राखी बांधायला हीच बाई मिळाली? उद्धव यांचा मोदींना सवाल

अमित शहांना थेट आव्हान

हिंदूमध्ये फूट पाडू नका. अमित शहांना आवाहन देतो की, हिंमत असेल तर मुंबई पालिका निवडणूक एका महिन्यात घेऊन दाखवा, त्यातच विधानसभा घेऊन दाखवा. कुस्ती आम्हालाही येते. बघुया कोण कुणाच्या पाठीला माती लावतं ते...ज्यांनी इमान विकलं आहे ती बेईमान माणसं किती वेळ माझ्यासोबत राहतील...जा निघून जा..गेट आऊट... म्हणत उद्धव ठाकरेंनी बंडखोरांवरही टीका केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याला आव्हान

उद्धव ठाकरे म्हणाले की, मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी पंतप्रधान येणार आहेत. केंद्रीय यंत्रणा कामाला लागल्या आहेत. हे वातावरण पाहून घाबरुन जाऊ नका. आपल्याला जमिन दाखवणाऱ्यांना अस्मान दाखविण्याची कामगिरी आपल्याला करायची आहे. मी आव्हान देतोय...विरोधकांचे कोणतेही डावपेच यशस्वी होणार नाहीत. आता मुस्लिम शिवसेनेसोबत आहेत. कोरोनाच्या काळात मी भेदभाव न करता सर्वांचे प्राण वाचवले आहेत. हीच माझ्या आजोबांची वडिलांची शिकवण आहे.

शिवसेना कार्यकर्त्यांना आवाहन

देवेंद्र फडणवीस ही तुमच्या आयुष्यातील शेवटची निवडणूक आहे. आम्ही आमच्या आयुष्यातील पहिली निवडणूक आहे असं लढणार आहोत. आशा ताईंच्या गाण्याचा संदर्भ ठाकरे यांनी यावेळी दिला. आशाताई तुमची गाणी लोकप्रिय होतात त्याचे रहस्य काय, असा प्रश्न त्यांना विचारला होता. त्यावर आशाताई म्हणाल्या, आजही मी माझ्या आयुष्यातलं पहिलं गाण म्हणूनच ते गाते. तसेच आपणही जे गेले ते गेले....त्यांचा विचार करायचा नाही. तुम्ही सगळे कामाला लागा...प्रत्येक शिवसेनेची शाखा उघडी आणि त्यात गटप्रमुख दिसलेच पाहिजे. येणारी प्रत्येक निवडणूक आपल्यासाठी पहिली निवडणूक समजून लढा, असं आवाहन उद्धव यांनी केलं.

गायींच्या मृत्यूवरून भाजपला सवाल

महाराष्ट्रात गोमाता नाही का त्या काय फक्त दुसऱ्याच राज्यात आहे का, लम्पी आजाराविषयी उद्धव ठाकरेंनी सरकारला झापले आहे. फक्त शिवसेनेला संपविण्याचे काम सुरु झाले आहे. ठाकरे घराणं संपविण्यासाठी सगळं काही सुरु आहे. माझ्यासोबत आता समोर असलेले कार्यकर्ते आहेत. दाखवा शिवसेना संपवून असं आव्हानही उद्धव यांनी भाजपला दिलं.

हेही वाचा: Uddhav Thackeray : मुंबई पालिकेसाठी उद्धव ठाकरेंची टाईट फिल्डिंग; भाषणातून...

कोरोना काळातील कामाचं दिलं उदाहरण

मी केलं म्हणून आज तुमचं सरकार आज वळवळतंय....कोरोनामध्ये मला माझ्या जनतेचे प्राण प्रिय होते. उत्तर प्रदेश आणि इतर ठिकाणी जे घडलं ते महाराष्ट्रात झालं नाही. कोर्टानं आपलं कौतूक केलं. मुंबई ज्याप्रकारे सांभाळली त्याचं कौतूक कमळाबाईला नाही तर परदेशातील लोकांना आहे. यांचं आता असं झालं की, कुणी काही काम केलं की, लगेच भ्रष्टाचार झाला असे बोंबलून टाकायचं. लोकांना बदनाम करुन टाकायचे. ज्यांच्यावर तुम्ही भ्रष्टाराचाराचे आरोप करता आहात त्यांना तुम्ही क्लिन चीट देत आहात. मला पंतप्रधानाचे आश्चर्य वाटते, ज्या बाईनं आरोप केले तिच बाई मिळाली का तुम्हाला राखी बांधायला.

Web Title: Uddhav Thackeray Shivsena Melava Speech Eknath Shinde Group Bjp

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..